मेल, एक्प्रेसमध्ये चोऱ्या करणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेल, एक्प्रेसमध्ये चोऱया करणाऱया कांचन सिंगला रेल्वे गुन्हे शाखेने गजाआड केले. त्याच्याकडून पोलिसांनी 2 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तक्रारदार हे गुलशना मिर्झा या एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेश येथून अवध एक्प्रेसने मुंबईला येत होत्या. प्रवासादरम्यान रात्री त्या झोपल्या असता त्यांची पर्स आणि मोबाईल अज्ञात चोरटय़ाने चोरून नेला. याप्रकरणी गुलशना यांनी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी कांचनला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर कांचनने चोरीची कबुली दिली.