
वैद्यकीय पेशा सांभाळून फोटोग्राफी, चित्रकला अशा विविध कला जोपासणाऱया डॉक्टरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘डॉक्टर्स आर्ट शो’ वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. दीपकला फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते झाले. डॉक्टर्स कला प्रदर्शनात डॉ. अवनिश राजन, डॉ. जतिन शाह, डॉ. शेखर भोजराज, डॉ. सलोनी कुलकर्णी-पटवर्धन, डॉ. कौशल छत्रपती, डॉ. सोनल शाह, डॉ, सोनाली सराफ, डॉ. गजेंद्र निकम असे देशभरातील अनेक डॉक्टर्स सहभागी झाले असून त्यांची चित्रकला व फोटोग्राफी पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतील 10 टक्के रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येईल. हे प्रदर्शन 28 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाऴी 7 या वेळेत पाहता येईल.
























































