विशेष : आगीपासून स्वसंरक्षण

17

>>प्रतिनिधी

आपल्या मुंबईतील उंचच उंच टॉवर्सआलीशान राहणीमानपण अशा टॉवर्सना जेव्हा आग लागते तेव्हाअग्निशमन दल पोहचतेच, पण त्यापूर्वी स्वसंरक्षण कसे करावे

 आग  लागणे’ ही अचानक उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती… बऱ्याच ठिकाणी बांधलेल्या गगनचुंबी इमारती, टॉवर, दाटीवाटीने वसलेल्या परिसरात आग लागणे ही हल्ली नित्याची बाब होत चालली आहे. यासाठी इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षितता याबाबत तेथे राहणाऱ्या नागरिकांनीही सजग राहणे गरजेचे आहे. कारण ऐनवेळी लागलेल्या आगीवेळी काय करावे, हे सुचत नाही. यामुळे अनेक जणांचा जीव जातो. आगीसंदर्भातील सूचनांचे पालन करणे. महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या घटकापासून संरक्षण मिळण्यासाठी प्रत्येक इमारताने आगविषयक वीमा कवच घ्यायला हवे. यामुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि जखमी, मृत व्यक्तींच्या वारसांना आर्थिक भरपाई देण्यासाठी यामुळे मदत होते. आगीसारख्या घटना घडू नयेत यासाठी मोठमोठय़ा इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनीही थोडी काळजी घेतली तर असे बरेच प्रसंग टाळता येऊ शकतात.

उपाययोजना

> ओल्या हातांनी विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नका.

> विजेच्या उपकरणांजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू नका.

> विजेच्या तारांचे जोड उघडे ठेवू नका. ते इन्स्युलिन टेपने झाका.

> पेटणाऱ्या वस्तू विजेपासून दूर ठेवा.

> घरात कोणी नसताना किंवा झोपताना तेलाचे दिवे, मेणबत्ती विझवा.

> ओव्हनमधल्या पदार्थाने पेट घेतल्यास वीजपुरवठा त्वरित बंद करा.

स्वतःचे रक्षण कसे कराल?

> आगीची तीक्रता लक्षात घेऊनच ती विझवण्याचा प्रयत्न करा. आग मोठी असेल तर अग्निशमन दलाशी संपर्क करा.

> लिफ्टचा वापर करू नका. अतिउत्साहीपणा दाखवू नका. स्वतःला आणि कुटुंबियांना आगीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

> विषारी धूर आणि गरम हवा धोकादायक असते. धुरामुळे श्वासास त्रास होत असेल तर जमिनीवर रांगत बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

> आग लागलेल्या घरातील दरवाजा आहे की नाही, हे हाताच्या तळव्याच्या मागून पाहा. दरवाजा गरम असेल तर उघडू नका. जर आग नसली तर धूर आत येऊ शकतो. धुरामुळे दरवाजा उघडत नसेल तर खिडकीतून बाहेर पडाण्याचा प्रयत्न करा.

> कपडय़ाला आग लागली असेल तर जमिनीवर लोळा. लोळत असताना आगीचा भाग जमिनीवर दाबण्याचा प्रयत्न करा.

> प्रिंकलर्स, हायड्रंटस, स्मोक फायर डिटेक्टर आगीमुळे संभवणारे नुकसान कमी करण्यासाठी मदत करतात. या सुरक्षा यंत्रणांची नियमित तपासणी करावी. ते चालू स्थितीत आहेत का हे पाहावे. याचा वापर करण्याचे प्रशिक्षण कर्मचारी आणि घरातील व्यक्तींनी घ्यावे.

आग बघितल्यावर… 

> आग-आग असे मोठय़ाने ओरडून आजूबाजूच्या लोकांना सावध करा.

> अग्निशमन दल, नगरपालिका आणि पोलीस यांना आगीविषयी कळवा.

> अग्निशमन दलाची मदत मिळेपर्यंत आग आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा.

> दारे-खिडक्या बंद करा. वीजपुरवठा बंद करा. ज्वलनशील पदार्थ आधी हलवा.

> शक्य असल्यास आगीच्या सभोवतालचा परिसर पाण्याच्या फवाऱ्याने भिजवा.

> योग्य प्रकारचे अग्निशमनाचे माध्यम वापरून आग विझवा.

> फायर एक्झिट खुणांच्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

गगनचुंबी इमारतीसंदर्भात तरतुदी

> उंच इमारतींमध्ये 100 टक्के स्वयंचलित अग्निशमन संरक्षणात्मक यंत्रणा असते.

> एखाद्या मजल्यावर आग लागल्यास ही यंत्रणा ताबडतोब कार्यान्वित होते आणि आगीची माहिती नियंत्रण कक्षाला कळते.

> प्रत्येक इमारतीने आगप्रतिबंधक यंत्रणेचे फायर ऑडिट करायचे असते.

> बहुमजली इमारतीला आग लागल्यास संकटकाळी बाहेर पडण्यास एकमेव मार्ग म्हणजे जिना. जिना सगळ्यांना सहज दिसेल अशा ठिकाणी असावा.

आपली प्रतिक्रिया द्या