5 वे तंत्रज्ञान 5G

>> अमित घोडेकर

आता 5जी चे दिवस लवकरच सुरू होतील. अजून किती आधुनिक होणार आहोत आपण… या तंत्रज्ञानाने.

इंटरनेटचे विश्व आता खऱया अर्थाने सुपरफास्ट होणार आहे. आतापर्यंत आपण वायरलेस इंटरनेट, ब्रॉडबँड इंटरनेट, मोबाईल इंटरनेट असे इंटरनेटचे नानाविध प्रकार पाहिले आहेत. पण इंटरनेटच्या जगात खरी क्रांती घडली ती 4G च्या आगमनानंतर. 4G इंटरनेटमुळे आपणास फास्ट इंटरनेट आपल्या आयुष्यात कसा बदल घडवू शकतो हे कळले आणि आता इंटरनेटची पाचवी पिढी अर्थात 5G आपल्यासमोर हजर झाली आहे. इंटरनेटची ही पाचवी पिढी आपले आयुष्य त्याच्या वेगाने सर्वार्थाने बदलणार आहे. जगातील सगळय़ाच मोबाईल कंपन्या सध्या इंटरनेटच्या नवीन पिढीवर चालणारे नवीन मोबाईल बनवण्याच्या मागे लागले आहेत. पुढील काही महिन्यांत सॅमसंगचा नोट 10 किंवा नवीन आयफोनदेखील 5G वर चालणारे येणार आहेत.

5G नंतरचे टेक युग मोठय़ा प्रमाणात बदलणार आहे. 5G मुळे एका सेकंदात चक्क 20 GB एवढा डेटा ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे आयुष्यात अनेक चमत्कारीत घटना घडणार आहेत. अशा घटना ज्याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही.

5G चा चमत्कार ः 4G मुळे आपण व्हिडीओ कॉल, मोबाईल टीव्ही सुपरफास्ट इंटरनेट अशा अनेक गोष्टी कधीही व कुठेही वापरू शकत होतो. 5G आपणास हे सर्व तर देणार आहेच, पण त्यापेक्षाही अधिक वैशिष्टय़पूर्ण व अनोख्या सेवा मिळवून देईल. त्यामुळेच 5G सेवा ही खरं तर एक चमत्कारच असणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी ः आजकाल ई-लार्ंनगसारख्या अनेक सेवा या इंटरनेटवर चालतात. अनेक कंपन्यांनी तर खास विद्यार्थ्यांसाठी संगणक तसेच टॅबलेटदेखील तयार केले आहेत. 5G मुळे विद्यार्थी तसेच त्यांचे शिक्षक अगदी शहरातील किंवा गावातील शाळा एकमेकांबरोबर इंटरनेटने जोडता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करण्यापासून ते अगदी इतर शाळा/कॉलेजमधील अद्ययावत गोष्टींची माहिती मिळवण्यापर्यंत कोठेही होऊ शकतो.

तरुणांसाठी ः सुपरफास्ट इंटरनेटचा खरा फायदा तरुणवर्गाला होणार आहे. आता सोशल नेटवार्ंकगच्या कट्टय़ावर असो किंवा एखादा चित्रपट डाऊनलोड करायचा असेल, अगदी लाईव्ह टीव्ही बघायची असेल तरी 5G मुळे कधीही कशावरही सुपरफास्ट इंटरनेटचा आनंद लुटू शकता.

सर्वांसाठी ः खरं तर 5G सुपरफास्ट इंटरनेटचा फायदा सर्वांनाच होणार आहे. 5G मुळे तुम्ही मोठमोठय़ा आकाराच्या फाईल्स काही क्षणातच कोणालाही ई-मेलद्वारे सहज पाठवू शकतो. 5G मुळे व्हिडीओ कॉन्फरन्सचा दर्जादेखील वाढणार आहे. जगातील एका कोपऱयातील व्यक्ती कोणाशीही कधीही संपर्कात राहू शकतो. सरकारच्या विविध ई-सेवादेखील 5G मुळे आता सुपरफास्ट होणार आहेत. टेलिमेडिसीनच्या माध्यमातून 5G चा वापर करून देशातील कोणत्याही कोपऱयातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारदेखील देणे शक्य होईल.

इलेक्ट्रिक कार्स आणि रोबॉटस् –
सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक कार्स आणि रोबॉटस्बद्दल बऱयाच गोष्टी अतिशय वेगात घडत आहेत. 5G मुळे या क्षेत्रात खूप उलथापालथ होणार आहे. फास्ट इंटरनेटमुळे अनेक रोबोटिक सेवा आपल्यासमोर येणार आहेत.
सुपरफास्ट मोबाईल टू मोबाईल कनेक्टिविटी
सुपरफास्ट फाईल शेअरिंग
सुपरफास्ट व्हिडीओ कॉन्फरन्स
सुपरफास्ट ऑनलाइन गेमिंग
लाइव टीव्ही
4G पेक्षा 20 पट अधिक वेग
सुपरफास्ट सोशल नेटवार्ंकग

हिंदुस्थान सरकारदेखील पुढील 100 दिवसांत 5G सेवेची चाचणी सुरू करणार आहे. त्यामुळे नेटकऱयांना लवकरच 5G चा चमत्कार अनुभवता येणार आहे.

– amitghodekar@hotmail.com