
>> देवांग जानी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदावरी नदीच्या पात्रात झालेल्या काँक्रीटीकरणात नदीतील 17 कुंडं आणि जलस्त्रोत्रात बुजले गेले. गोदामाई प्रवाहित राहण्यासाठी लढणाऱया संस्थांच्या पुढाकाराने हे जलस्त्रोत्रात पुनरुज्जिवीत होण्याचा मार्ग मोकळा होण्यास मदत होत आहे. आज अॅक्शन फॉर रिव्हर म्हणजेच नद्यांसाठी कृती दिन साजरा होताना हा उपक्रम नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल.
नद्या निसर्गनिर्मित असतात, मानवनिर्मित नव्हे, त्यामुळे नदीत मानवीय हस्तक्षेप वर्जित आहे अनादी कालापासूनचे ऋषीमुनी, साधूसंत, महंत, राजा आणि शासन-प्रशासन, कोणीही दावा करू शकत नाही की, नदीची निर्मिती आम्ही केली. आज अॅक्शन फॉर रिव्हर हा दिवस म्हणजेच नद्यांसाठी कृती दिन साजरा होताना गोदावरी नदीच्या पात्रातील जलस्त्रोत्रात पुनरुज्जिवीत होण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले गेले.
महाराष्ट्राची दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱया श्री गोदावरी नदीत नाशिक येथे इ.स. 1700 च्या काळात अनेक महान व्यक्तींच्या योगदानातून बांधली गेलेली 17 पुरातन कुंडे आहेत. अहिल्यादेवी होळकर, गोपिकाबाई, बाजीराव पेशवे (प्रथम) यांच्या योगदानातून ही कुंडं साकारली गेली होती. नदीपात्रातील ही 17 कुंडं 2001 मधील कुंभमेळ्याच्या निमित्ताने झालेल्या काँक्रीटीकरणात बुजविली गेली. यामुळे तेथील अंतर्गत जलप्रवाह लुप्त होऊन वर्षानुवर्षे स्वप्रवाही असणारी गोदावरी नदी गंगापूर धरणाच्या पाण्यावर परावलंबी होऊन गेली. नदीकाठावरील जैवविविधता संपुष्टात आली. घाटांची स्वच्छता राखण्यास प्रशासनाला अपयश आल्याने नदीच्या प्रदूषणात भर पडली. अशा गोदावरी मायेला पुनर्जिवीत करण्यासाठी पावलं उचलणे गरजेचे होते.
गोदावरी पात्र तळ सिमेंट-का@ंक्रीटमुक्त करून पात्रातील 17 प्राचीन कुंडे पुनर्जीवित करणे तसेच नदीतील जिवंत जलस्रोत पुनर्जीवित करून नदी पुनःप्रवाही करणे यासाठी आमच्या गोदाप्रेमी सेवा समितीद्वारे बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटीअर सन 1883 व सिटी सर्व्हे कार्यालयातील डीएलआर मॅप सन 1917 या सबळ पुराव्यानिशी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेला दिलेल्या न्यायालयीन आदेशानुसार पुढे नाशिक स्मार्ट सिटीतील ‘गोदा प्रोजेक्ट’अंतर्गत पहिल्या टप्प्यात 17 प्राचीन कुंडांपैकी 5 कुंडांचे तळ कां@क्रीटीकरण काढण्याचे काम सुरू झाले. सध्या हे काम प्रगतिपथावर असून त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात अनामिक, दश्वाश्वमेघ, पाचकुंड, रामगया, पेशवे, खंडोबाकुंड या कुंडांचे काम करण्यात आले. यापैकी दोन कुंडांतील 1920 टन (120 डंपर) सिमेंट-का@ंक्रीट काढल्यानंतर तब्बल 19 वर्षांनीदेखील नदीतील जिवंत जलस्रोत दिसून आले. ही आनंददायी बाब आहे.
नाशिकच्या नदी परिसरातील भौगोलिक स्थिती बेसॉल्ट रॉकवर आधारित आहे. खडकात (रॉक फ्रॅक्चर) फटी असतात, त्यातून सतत पाणी येत असते. गोदावरी नदीपात्रातील जिवंत जलस्रोताचे अस्तित्व तपासणीसाठी तीन महिन्यांपूर्वी नाशिक स्मार्ट सिटीमार्फत रामकुंडाजवळ ट्रायल बोअर घेण्यात आला. यात एका मिनिटात 41.38 लिटर पाणी व एका तासाला 2482.76 लिटर पाणी ट्रायल बोअरमधून पाणी बाहेर येत आहे असे दिसून आले. हे निश्चितच आश्चर्यकारक आहे. तसेच याच मात्रेत 24 तास अविरतपणे व सलगपणे ट्रायल बोअरमधून पाणी येते. यावरून सिद्ध होते की, नदीत सिमेंट-काँक्रीटीकरण करून तब्बल 19 वर्षे झाली तरीसुद्धा श्री गोदावरी नदीपात्रातील जिवंत जलस्रोत आज रोजी सुस्थितीत आहे. याला भूगर्भातील जलशास्त्र्ाातील एपंदरीत वैज्ञानिक परिभाषा बदलणारा चमत्कारच म्हटले पाहिजे. नाशिक स्मार्ट सिटीतर्फे गोदावरी नदीपात्रापासून 200 मीटर अंतरावर भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून 18 फूट खोदलेल्या खड्डय़ातून नियमित पाणी येत आहे. यावरून सिद्ध होते की, नदी परिसरात भूगर्भातील जलसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्याचे योग्य रीतीने जतन होणे आवश्यक आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने झालेल्या काँक्रिटीकरणात नदीपात्रातील नैसर्गिक झरे लुप्त झाले. या जलस्त्र्ााsतांना तसेच कुंडात अगदी उन्हाळ्यातही पाझर सुरू असे. मात्र काँक्रिटीकरणामुळे हा पाझर थांबला आणि 2016 मध्ये गोदेचे पात्र कोरडेठाक पडले. मात्र आता हे जलस्त्रोत पुनर्जिवीत झाले असून गोदावरी पुन्हा प्रवाहित होण्यास मदत होणार आहे.
नदीपात्रातील 17 पुरातन कुंडांपैकी 5 कुंडांचे काम प्रगतिपथावर असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान रामकुंडासहित उर्वरित 12 कुंडांचे तळ काँक्रीटीकरण हटवण्यासाठी पावलं उचलली जातील या अपेक्षा आहेतच. धर्मशास्त्रानुसार व आपल्या पूर्वजांनी नदीला ‘आई’चा दर्जा दिलेला आहे. कारण आई म्हटले की, मातृत्व भाव जागृत होतो. नदीप्रति आत्मीयता वाढते, पण खेदाने सांगावेसे लागते की, आज नदी संस्कृती लुप्त होत आहे. गोदावरी नदी बारमाही ठेवण्यासाठी गोदामाईच्या पात्रातील जलस्त्र्ाsत व झरे पुनरुज्जिवीत करण्याची जबाबदारी आपली आहे.





























































