
>> दिलीप जोशी
एडिसन यांनी ध्वनीमुद्रणाचा शोध लावल्यावर त्या काळापासून अनेक व्यक्तींचे आवाज ध्वनीमुद्रित होऊ लागले. पुढच्या काळात त्याला ध्वनीचित्रणाची जोड मिळाली. अशा काही दुर्मीळ ध्वनीमुद्रणातील ठेवा या सदरातून उलगडण्याचा प्रयत्न. 5 मार्च रोजी त्यांचा लता मंगेशकर यांच्यावरील हृदय़ कार्यक्रम ऐकला. इतरही अनेकांनी हा छंद मनःपूर्वक जोपासलाय.
एखाद्या काळातील, संस्कृतीमधील भाषा, संगीत, वस्त्र्ाप्रावरणं, दागदागिने वगैरे गोष्टी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत जातच असतात. असं सर्वंकष संक्रमण होत असताना त्यातलं काही बराच काळ तसंच टिकून राहतं, तर काही गोष्टीत काळानुसार बदल घडतात. मग पूर्वी या गोष्टी कशा होत्या? याचं उत्तर शोधायला वस्तुसंग्रहालयं (म्युझियम) किंवा जतनालये उपयोगी ठरतात. त्यापैकी प्राचीन काळापासूनच्या वस्तू कशा होत्या याचा नेमका अंदाज येतो. मूर्तीकला किंवा चित्रकलेतून तत्कालीन वेशभूषाही समजते. प्राचीन लेखनातून त्या वेळच्या भाषांचं स्वरूप समजतं. (तरीही सिंधू संस्कृतीची भाषा आजवर समजलेली नाही हे एक आव्हानच आहे) तत्कालीन बोलणं किंवा गाणं कसं होतं यापैकी वाद्यनादामधून गानप्रकारांचा मागोवा लागतो, पण बोलीभाषा नेमक्या कशा होत्या? त्या वेळच्या लोकांची वाक्शैली कशी होती याची केवळ कल्पनाच करावी लागते.
थॉमस अल्वा एडिसन नावाच्या महान व्यक्तीने अनेक गोष्टींचा वैज्ञानिक धांडोळा घेतला आणि आवाज ‘मुद्रित’, ‘ग्रथित’ करण्याची सोय झाली. एडिसन यांनी पहिला मानवी स्वर ध्वनिमुद्रित केला. त्या रेकॉर्डिंगने जगात आवाजी क्रांती घडवली. हळूहळू अनेक रेकॉर्डिंग कंपन्या युरोप अमेरिकेत उदयाला येऊन त्यांच्यापैकी काही उत्साही लोकांनी जगभर दौरे करून विविध भाषांमधली गाणी, भाषणं, संवाद रेकॉर्ड करण्याचा ध्यास घेतला. आपल्याकडेही गोहरजान यांचं गाणं कोलकाता येथे 1903 मध्ये प्रथम रेकॉर्ड केलं गेलं आणि मेणाच्या तबकडय़ांवरील (त्याला प्लेट म्हटलं जायचं) ध्वनिमुद्रण फोनोच्या (म्हणजे फोनोग्राम किंवा ग्रामोफोन) सहाय्याने केव्हाही ऐकता येऊ लागलं. हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीताचं प्रचंड ध्वनिमुद्रण आपल्याकडे मुंबईत पंडित भातखंडे यांनी केलं. त्याचबरोबर तत्कालीन गाणी, कविता यांचंही ध्वनिमुद्रण झालं. काही नेत्यांची दुर्मिळ भाषणं आणि धनिकांनी खासगी बैठकीत केलेली ध्वनिमुद्रणं यातून अगदी एकोणिसाव्या शतकात जन्मलेले स्वर आणि ध्वनी आपल्याला ऐकता येतात.
कालांतराने चित्रपटाचा जमाना आला आणि केवळ ध्वनीच नव्हे तर दृश्यसुद्धा नोंद करता येऊ लागलं. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच्या शेकडो ‘फिल्म्स’ जगात उपलब्ध आहेत. लुमिए नावाच्या फ्रेंच बंधूंनी चलत्चित्राचा यशस्वी प्रयोग पॅरिसमध्ये केल्यावर थोडय़ाच वर्षांत त्यांनीच मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये त्यांचे अगदी काही मिनिटांचे मूकपट दाखवले. त्याने प्रेरित होऊन दादा सावे (भाटवडेकर), दादासाहेब तोरणे, गोखले आणि दादासाहेब फाळके अशा ध्येयासक्त मंडळींनी देशी सिनेमाचा पाया घातला.
ध्वनी आणि चित्र या दोन्हींच्या मुद्रणात नंतर वेगाने सुधारणा झाली. रेकॉर्डची जागा टेपने घेतली. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे डिजिटाइज पद्धतीने केली जाणारी दृश्राव्य नोंद. आता तर ती प्रत्येकाच्या हातातील मोबाईलमध्येही उपलब्ध आहे. लोक टेक्नोसॅव्ही (की अनेकदा स्लेव्ही?) होऊन क्षणाक्षणाला असे दृश्राव्य संदेश परस्परांना पाठवत असतात. त्यामुळे त्याला दुर्मिळता मूल्य (स्केअरसिटी व्हॅल्यू) असण्याचं कारण नाही. परंतु ज्या काळात हे सर्वच प्रकारचं मुद्रण अगदी नवं आणि दुर्मिळ होतं त्या काळात ज्यांनी ते केलं त्यांचे मोठे उपकारच आहेत. कालांतराने जुन्या झालेल्या रेकॉर्डस् जुन्या बाजारातून धुंडाळून त्यावर नोंदलेली गानकला, भाषणं वगैरे जमवण्याचा छंद अनेकांनी जोपासला आणि ‘रेकॉर्ड कलेक्टर्स’ची संस्थाच उभी राहिली. मुंबईत सुरेश चांदवणकर यांनी असाच ध्यास घेऊन हजारो रेकॉर्डस्चा खजिना स्वखर्चाने जमवला आहे.
1980 च्या दशकात मला मुंबईचे प्रभाकर दातार यांना भेटण्याची संधी मिळाली. रिझर्व्ह बँकेत काम करणाऱया दातारांनी त्यांच्या घरी काही हजार दुर्मिळ रेकॉर्डस्चा संग्रह केलेला पाहिला आणि ऐकला. त्यावर ‘श्री’ साप्ताहिकात चाळीस वर्षांपूर्वी ‘रेकॉर्ड ब्रेक दातार’ अशी त्यांची मुलाखतही प्रसिद्ध केली. त्यानंतर त्यांनी काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणं मला टेप करून दिली. योगायोगाने 93 वर्षांच्या दातारांची नुकतीच भेटही झाली. त्यांच्याकडून मिळालेल्या दुर्मीळ आवाजांमुळे पुढच्या काळात मलाही काही लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती टेप करण्याची संधी मिळाली. या संचिताविषयी या स्तंभातून जाणून घेऊया. z [email protected]





























































