
>> मृणाल घनकुटे
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाणी, विषाणू तसेच जंतूंचा त्वचेशी थेट संपर्क येऊन अनेक त्वचाविकारांचा सामना करावा लागू शकतो. या दिवसांमध्ये आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेच्या संसर्गापासून दूर राहण्याकरिता काय उपाय करता येतील याबाबाबत डर्मेटोलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांनी दिलेली माहिती…
कारणे कोणती
- पावसाचे पाणी हवेतील प्रदूषकांमध्ये मिसळते (धुळीचे कण, रासायनिक धूर इत्यादी). त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात आणि त्वचेला खाज सुटते.
- पावसामुळे बुरशीचे प्रमाण वाढते आणि कीटकांची पैदास होते. त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
- खरुज ही त्वचेची अॅलर्जी आहे, जी पाण्याद्वारे पसरते आणि ती संसर्गजन्य असते. यामुळे त्वचेवर लहान फोड दिसून येतात.
त्वचारोग
हा संसर्गजन्य नसला तरी इसब त्वचेसाठी घातक ठरू शकतो. कारण त्यामुळे जळजळ, लालसरपणा आणि खाज सुटते. उपचार न केल्यास ते त्वचेला खडबडीत करू शकतात, त्वचेवर भेगा पडू शकतात. हे आर्द्रता, तापमानातील चढउतार यामुळेदेखील उद्भवू शकते आणि त्यामुळे त्वचारोग निर्माण होतो.
पावसाळय़ात संसर्ग निर्माण करणारे घटक
- बुरशीजन्य संसर्ग ः ही बोटांच्या मधल्या भागात दिसून येते. त्यामुळे त्वचेवर संसर्ग निर्माण होते. त्यामुळे त्वचेला छेद जाणे, खाज सुटणे, लालसरपणा येतो. बुरशीआधारित अॅलर्जीचे मुख्य कारण म्हणजे घाम येणे, किती सतत पाण्यात राहणे.
- ओले कपडे आणि बुटांमुळे
अॅलर्जी ः ओले कपडे, शूज आणि मोजे शरीरावर घर्षण करतात. त्यामुळे मांडीच्या भागात खाज सुटते. सिंथेटिक कपडय़ांमुळेही त्वचेचा संसर्ग उद्भवतो. खाज सुटणे, पायाच्या बोटांमध्ये होणारी जखम आणि एक संसर्गजन्य बुरशीजन्य रोगामुळे खाज सुटून पांढरे पह्ड दिसून येतात. कधी कधी पायांना भेगा पडणे. फोडांमध्ये जळजळ होण्याची शक्यता असते. - पावसाळय़ात निर्माण होणाऱया ओलसरपणामुळे फर्निचर व साहित्यांवर रासायनिक किंवा बायोलॉजिकल क्रिया होऊ शकते. यामुळे घरामध्ये वायू प्रदूषण होऊ शकते. म्हणूनच ओलसरपणामुळे दमा आणि खोकला व घसा खवखवणेसारखे श्वसनविषयक आजार होण्याचा धोका वाढतो.
- उपचार न केल्यास बुरशीजन्य संसर्ग आणि यीस्ट संसर्गात वाढ होऊ शकते. रिंगवर्म्स दमट वातावरणात वाढतात आणि अनेकदा संसर्गजन्य असतात. ते टॉवेल, मेकअप, भांडी आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर इत्यादींमुळे पसरू शकतात.
अॅलर्जी कशी टाळाल?
- त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवणे.
- घट्ट कपडे आणि रबराच्या वस्तूचा वापरणे टाळा.
- सुती कपडय़ांचा वापर करणे.
- जास्त वेळ ओले न राहणे आणि पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने अंघोळ करणे किंवा हात, पाय धुवावेत.
- घाणेरडे पाणी किंवा अॅलर्जी निर्माण करणाऱया घटकांपासून दूर रहा. जसे की, प्राण्यांचे केस, धूळ, घाण आणि परागकण.
- त्वचेकरिता औषधी साबण, ऑण्टिफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारी पावडर वापरा,
- बाहेर पडण्यापूर्वी दररोज सनस्क्रीन वापरा.
- घरातील चादरी, टॉवेल, गाद्या स्वच्छ आणि कोरडय़ा ठेवा.
योग्य निदान आणि उपचारासाठी त्वचा विकार तज्ञांशी संपर्क साधा.





























































