लोकविधा – सती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मुकुंद कुळे
आज घट बसतायत. पुढचे नऊ दिवस म्हणजे केवळ सर्जनोत्सव. या काळात आदिशक्तीची नानाविध रूपांत पूजा मांडली जाईल, तिचं कोडकौतुक केलं जाईल, पण या आदिशक्तीचाच अंश असलेल्या आजच्या स्त्रीचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा, तिच्या इच्छा-आकांक्षांचा, तिच्या भावभावनांचा आपण खरंच सन्मान करतो का? नाहीतर रोजच्या रोज तिच्या किंकाळ्या आपल्याला का ऐकू आल्या असत्या? अगदी तिने तिच्या मनाप्रमाणे जगायचं-वागायचं म्हटलं तरी समाजपुरुषाला त्रास होतो, जसा तो दक्ष प्रजापतीला झाला होता. त्याच्या पुरुषी अहंकारानेच तर सतीचा जीव घेतला.

आज घट बसतायत. पुढचे नऊ दिवस म्हणजे केवळ सर्जनोत्सव. या काळात आदिशक्तीची नानाविध रूपांत पूजा मांडली जाईल, तिचं कोडकौतुक केलं जाईल, पण या आदिशक्तीचाच अंश असलेल्या आजच्या स्त्रीचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा, तिच्या इच्छा-आकांक्षांचा, तिच्या भावभावनांचा आपण खर सन्मान करतो का? नाहीतर रोजच्या रोज तिच्या किंकाळ्या आपल्याला का ऐकू आल्या असत्या? अगदी तिने तिच्या मनाप्रमाणे जगायचं-वागायचं म्हटलं तरी समाजपुरुषाला त्रास होतो, जसा तो दक्ष प्रजापतीला झाला होता. त्याच्या पुरुषी अहंकारानेच तर सतीचा जीव घेतला.
दक्ष राजाने एकदा आपल्या मुलींना विचारलं, ‘’तुम्ही कोणाचे भाग खाता?” सगळ्यांनी उत्तर दिलं, ‘’बाबा, आम्ही तुमचेच भाग खातो.” मात्र सतीने त्याला म्हटलं, ‘’मी माझे भाग खाते.” या एका उत्तराने दक्ष राजाने तिच्याशी वाकडीक घेतली ती कायमचीच.

‘’मी तुझ्यावरच अवलंबून आहे,” असं एखाद्या स्त्रीने सांगितलं की, कुठल्याही पुरुषाचा अहंकार सुखावतो. मग तो पुरुष नवरा असो, बाप असो नाहीतर भाऊ किंवा मुलगा. स्त्राीचं दुय्यमत्व-परावलंबित्व या प्रत्येकाने गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळेच त्यांच्या या गृहीतकाच्या उलट एखाद्या स्त्राrने स्वबळावर काही मिळवलं, कर्तृत्व गाजवलं, मला तुमची गरज नाही म्हटलं की, पुरुष मंडळी असतातच तयार तिची खबर घ्यायला किंवा धिंडवडे काढायला. अगदी आताची सवय नाही, फार जुनी, थेट पुराणांपासून चालत आलेली परंपरा आहे ही! नाहीतर एवढा ब्रह्माचा मुलगा असलेल्या दक्षाला आपल्या लेकीच्या म्हणजेच सतीच्या उत्तराचं एवढं वाईट वाटायला कशाला हवं होतं?
असं काय म्हणाली होती सती?

‘’मी तुमचे भाग खात नाही,” एवढंच तर म्हणाली होती, पण मुळात बाप असलेल्या दक्षाने आपल्या मुलींना विचारावंच का, की तुम्ही कोणाचे भाग खाता? बाप म्हटल्यावर त्याचं कर्तव्यच होतं मुलींना पोसण्याचं, त्यांचे लाडकोड पुरवण्याचं. त्यात जगावेगळं असं तो काय करत होता? पण अहंकारी असलेल्या दक्षाला राहावलं नाही आणि मुली मोठय़ा झाल्यावर एक दिवस त्याने साऱया जणींना जवळ बोलावलं. लेकींना वाटलं, बाप माया करायला जवळ बोलावतोय, पण झालं उलटंच. सगळ्या जणी जमल्यावर दक्षाने थेटच त्यांना विचारलं, ‘’तुम्ही कोणाचं भाग खाता?”

बिचाऱया सगळ्या जणी तरी काय उत्तर देणार? गुपचूप सगळ्या म्हणाल्या, ‘’बाबा, आम्ही तुमचेच भाग खातो.”
पण सती नाही तसं म्हणाली. कारण आपण परावलंबी आहोत ते तिला मान्यच नव्हतं. बापाच्या घरी राहत असलो म्हणून काय झालं? मला माझं मन आहे, मला माझं अस्तित्व आहे आणि मुख्य म्हणजे मला माझे विचार आहेत, असं तिचं पूर्वीपासूनचं ठाम मत होतं. ती दुसऱयाच्या ताळतंत्राने चालणारी नव्हती. तिचा आपल्या सामर्थ्यावर विश्वास होता आणि प्राप्त परिस्थितीला सामोरी जायला ती तयार होती. म्हणूनच तर ती बाणेदारपणे म्हणू शकली, ‘’बाबा, मी तुमचे भाग नाही खात, मी माझेच भाग खाते.”

तिच्या या उत्तराने दक्ष राजा कोण चिडला! आपली पोरगी आपल्यालाच आव्हान देतेय, असं त्याला वाटलं. मुख्य म्हणजे त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. आपण वाढवलेली मुलगी आपलं स्वामित्व नाकारते हे दक्षाला सहनच झालं नाही. तेव्हापासून त्याने सतीशी वाकडीक घेतली, ती अखेरपर्यंत.
सतीचं लग्न, तिचं माहेरपण… कशालाही त्याने गोड मानलं नाही की तिची कसली हौसमौज पुरवली नाही. सती सोडून साऱया मुलींची लग्नं त्याने थाटामाटात लावून दिली. सतीच्या बहिणींनीही सारे साजिरे-गोजिरे देव आणि ऋषी निवडले वर म्हणून, पण सती तिथेही साऱयाजणींपेक्षा वेगळी उठून दिसली. तिने निवड केली ती स्मशानजोग्याची. जटा वाढवलेला, अंगाला राख फासलेला आणि चिलीम-गांजा ओढणारा तिचा वर म्हणजे ध्यानच होता. तिची ही निवडही दक्षाला मानवली नाही.
‘’काय पण ध्यान निवडलंय” असं मनाशी म्हणत त्याने कसंबसं तिचं लग्न लावून दिलं. एवढंच नाही, तर तिची आणि तिच्या नवऱयाची टरही उडवली, पण सतीला पक्कं ठाऊक होतं, आपला नवरा कोण आणि काय आहे ते! सतीचा हा नवराही मोठा बिलंदर. त्यानेही आपल्याबरोबर लग्नाचं मोठं चित्रविचित्र वऱहाड आणून दक्षाची आणि गाववाल्यांची भंबेरी उडवून दिली. सतीच्या या लग्नाची कथा पुराणकारांनी कधी गायली नाही, पण लोकगीत गायकांनी तिच्या लग्नाची हकीकत मोठय़ा बहारीने रंगवली आणि गायली आहे. ते म्हणतात-
तवा नवऱयाचं वऱहाड जमलं छत्तीस कोट
गावाबाहेर दिली आरोळी भेटावे लवकर
भेटूनशान वऱहाड गेलं गावात निघोनी
धुनीसाठी मारामारी येशीच्या सामोरी
लग्न लागता कपाळ
बडवी नवऱयाचा सासरा
जावय आम्हा भेटला
साऱया दुनियेचा म्हातारा
सतीने निवडलेल्या वराने साऱयांचीच अशी फसगत केली. “या थेरडय़ाने काय कलागत केली, कुणास ठाऊक?” असंच जो-तो म्हणू लागला, पण त्यांचीच नाही, सतीच्या आईचीही चकित व्हायची पाळी अजून बाकी होती. कारण सतीचा वर काही साधासुधा नव्हता. तिने तो खरोखरच अगदी लाखात एक शोधून काढला होता. एवढा होता तरी कसा सतीचा वर? तर लोकगीत गायक सांगतात-
लग्न लागता रूप पालटलं
पंचविशीत बाणेदार
आडपदराने सासू बघते
आपल्या लेकीचा वर
गोसावी नव्हे देव आहे सतीचं भाग्य थोर
महादेवाचं लग्न लागलं दिवस सोमवार..
म्हणजे सतीने देवाधिदेव महादेवाला पसंत केलं होतं, पण तिने केलेली महादेवाची निवडही नव्हती पसंत दक्षाला. कारण त्याचे बाकीचे जावई श्रीमंत, महालात राहणारे आणि देवाधिदेव असला म्हणून काय झालं, शेवटी शंकर राहणार स्मशानातच!
एकापरीने त्याला बरंच वाटलं. स्वत:चं भाग खाते म्हणणारीला चांगला भिकारी नवरा भेटला याचा त्याला आनंदच झाला. दारिद्रय़ाला कंटाळून आता कधीतरी येईल स्वत:च भीक मागायला तेव्हा कळेल तिला कुणाचं भाग खाते ते, असंही क्षणभर त्याच्या मनात येऊन गेलं. लग्न लागल्यावर फार काळ थांबवलंही नाही त्याने सती-महादेवाला. लगेच त्यांना निरोप दिला. जणू सती त्याची कुणी नव्हतीच.
खरं तर दक्षाने तेव्हाच तोडलं होतं सतीशी असलेलं नातं, जेव्हा तिने सांगितलं होतं, मी माझंच भाग खाते म्हणून. मात्र सती मुलगी असली म्हणून काय झालं, तिने बापाच्या अंकितच असायला हवं होतं. त्यामुळेच लग्नानंतर एकदाही बोलावलं नाही त्याने सतीला माहेरपणाला. सणावाराला ती वाट पाहायची, माहेरहून बोलावणं येईल म्हणून, पण नाहीच आलं कधी तिला हक्काचं बोलावणं.
.. आणि एक दिवस दक्ष कसला तरी यज्ञ करत असल्याची बातमी आली तिच्या कानावर. सगळ्या बहिणीही येणार असल्याचं कळलं तिला, पण सतीच्या सगळ्या बहिणींना नवऱयासकट येण्याची निमंत्रणं गेली होती. सतीही वाट बघत होती निमंत्रणाची, पण ते नाहीच आलं. तिला वाटलं, बाबा विसरले असतील पाठवायला, पण माहेरी जायला का कुणाचं निमंत्रण लागतं! तिनेही केली सामानाची बांधाबांध आणि महादेवाला म्हणाली, ‘’चला, आपण पण जाऊ या.”
महादेवाला ठाऊक होतं, आपलं जाणं दक्षाला आवडणार नाही ते. त्याने स्वत: यायला ठाम नकार दिला, तिलाही जाऊ नको म्हणाला, पण माहेरची ओढ सतीला गप्प बसू देईना. ती एकटीच निघाली नि पोहोचली बापाच्या घरी.
यज्ञाला सुरुवात झाली होती. तिच्या सर्व बहिणी आणि त्यांचे नवरे अग्रभागी बसले होते, पण सतीला बघून कुणी साधं हसलंही नाही आणि बसही म्हणालं नाही. दक्षाने तर आल्या आल्याच तिची आणि तिच्या नवऱयाची चेष्टा करायला सुरुवात केली. काहीही अद्वातद्वा बोलायला लागला तो. मायबाय सतीला नाही सहन झालं ते. स्वत:चा अपमान एकवेळ गिळला असता तिने मनातल्या मनात, पण महादेवाला लावलेला बोल नाही तिच्याने ऐकवला. बिचारी निमूट उठली आणि तिने धगधगत्या यज्ञकुंडाचाच गाठला तळ थेट. माहेरपणाला आलेली माहेरवाशीण बापाच्याच अहंकाराच्या अग्नीत जळून खाक झाली. तिची चूक एवढीच होती की, ती म्हणाली होती बापाला- ‘’मी तुमचे नाही, माझेच भाग खाते.”
मात्र बापाने आरंभलेल्या यज्ञात आत्माहुती देऊन सती संपली नाही. तिच्या स्वतंत्र विचारांची धग आजच्या पिढीपर्यंत पोचलेली आहे. यज्ञात सतीने आत्माहुती दिल्याचं समजताच ाढाsधायमान झालेला देवाधिदेव महादेव यज्ञस्थळी प्रकटला आणि सतीचं कलेवर आपल्या कवेत घेऊन तो थयथयाट करू लागला. त्या वेळी सतीच्या अंगप्रत्यंगाचे जे अंश संपूर्ण हिंदुस्थानभरात पडले, त्यातूनच तर बावन्न शक्तिपीठं निर्माण झाली… आणि त्यातील साडेतीन शक्तिपीठं महाराष्ट्रात आहेत. ही शक्तिपीठं म्हणजे सतीचाच तर वैचारिक वारसा आहे. ‘मी माझंच भाग खाते’ म्हणणाऱया सतीचा. मग आपण जर सतीची शक्तिस्थाने असणाऱया बावन्न पीठांचा गौरव करणार असू, तर मग तिचा कित्ता गिरवणाऱया आजच्या स्त्रीचा गौरव का नाही करायचा?
[email protected]