
>> नीती मेहेंदळे
तळ्यांचं शहर म्हणून नावारूपाला आलेलं ठाणे म्हणजेच शिलाहारांचं राजधानीचं शहर श्री स्थानक. शिलाहारांचं शिव या देवतेवरचं निस्सीम प्रेम त्यांनी त्यांच्या काळात बांधलेल्या एकाहून एक सरस स्थापत्याचा नमुना म्हणून सिद्ध झालेल्या शिवमंदिरांवरून सिद्ध होतं. हे शिवप्रेम जतन करणारं मासुंदा तलावाशेजारी (तलावपाळी) असलेलं सुंदर मंदिर म्हणजे काwपिनेश्वर मंदिर. आठव्या शतकापासूनचा वारसा जतन करीत असलेलं हे वैशिष्टपूर्ण शिवमंदिर आज जीर्णोद्धारित स्थितीत उभं आहे.
शिलाहारांचं ठाणं, राजधानीचं ठिकाण मानलं जाणारं श्री स्थानक म्हणजे आजचं ठाणे शहर. एक बाजू सागरसंपत्ती आणि दुसरीकडे सुपीक लाल माती असं, वेळोवेळी ‘महाराष्ट्राचा पॅलिपहर्निया’ म्हटलं जाणारं आपलं कोकण. भौतिक समृद्धीइतकाच याचा इतिहासही दांडगा. भौगोलिक व्यवस्थापनासाठी कोकणचे उत्तर आणि दक्षिण असे दोन सरळ सोयिस्कर भाग पाडले गेले आहेत.
रायगड, मुंबई, ठाणे उत्तर कोकणचे जिल्हे, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे दक्षिण दिशा सांभाळणारे. पैकी ठाणे जिह्याचं स्थान हे राष्ट्रपूट राजांच्या पदरी असलेल्या शिलाहार वंशाच्या इतिहासात विशेष समजलं जातं. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात या प्रदेशात शिलाहारांची राजवट उदयाला आली. तारापूर चिंचणीपासून पार पन्हाळेकाजी चिपळूणपर्यंत त्यांचं उत्तर कोकणात साम्राज्य पसरलं होतं असं तेथील सापडलेल्या ताम्रपटांवरून समजतं. तळ्यांचं शहर म्हणून पुढे नावारूपाला आलेलं ठाणे अर्थात तेव्हाचं श्री स्थानक त्यांनी राजधानीसाठी निवडलं होतं. शिलाहारांचं शिव या देवतेवरचं निस्सीम प्रेम त्यांनी त्यांच्या काळात बांधलेल्या एकाहून एक सरस स्थापत्याचा नमुना म्हणून सिद्ध झालेल्या शिवमंदिरांवरून सिद्ध होतं.
ठाणे शहरातच पस्तीसएक तलाव आहेत असे जाणकार सांगतात. आजघडीला ते सर्वच अस्तित्वात नसतीलही, पण त्यांपैकी काही आजही बऱयापैकी स्थितीत मौजूद आहेत आणि या तलावांच्या काठी किमान प्रत्येकी एक अशी ऐतिहासिक वा प्राचीन मंदिरं आहेत. ठाणे स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या मासुंदा तलावाशेजारी (तलावपाळी) आठव्या शतकापासूनचा वारसा जतन करीत असलेलं एक वैशिष्टय़पूर्ण शिवमंदिर आज जीर्णोद्धारित स्थितीत उभं आहे.
जांभळी नाका हे बाजाराचं, ठाणे शहरातलं अत्यंत वर्दळीचं खरेदीचं ठिकाण. या बाजारगर्दीतच असलेलं हे मंदिर ‘कोपिनेश्वर’ तसेच ‘काwपिनेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिरातील मुख्य शिवलिंग शेजारच्या मासुंदा तलावात सापडलं असं सांगितलं जातं व ते शिलाहार राजवटीच्या काळातलं आहे असं तज्ञांचं मत आहे.
मंदिराला चौफेर तटसदृश भिंत असून त्याला दोन प्रवेशद्वारं आहेत. पैकी एक मासुंदा तलावाला सन्मुख असून दुसरं ऐन बाजाराच्या दिशेनेच आहे.
मंदिराचा प्राकार भव्य असून बाजाराकडून मुख्य प्रवेशद्वार आहे. आत शिरताच ऐसपैस नंदी मंडप व मूळ काळ्या पाषाणातील आता रंगवलेला सुरेख सालंपृत नंदी मंदिराच्या वैभवाची ग्वाही देतो. शिलाहारकालीन म्हणून ओळखल्या जाणाऱया या मंदिराचा अठराव्या, एकोणिसाव्या तसेच पुन्हा विसाव्या शतकात जीर्णोद्धार झाला. मंदिराचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे प्रचंड मोठे शिवलिंग. त्याचा व्यास पाच फूट इतका मोठा असून उंचीही साधारण पाच फूट इतकी आहे. दरवर्षी काही अंशी याची उंची वाढत जाते अशी या शिवलिंगाबद्दल एक आख्यायिकाही रूढ आहे. ज्यावर्षी शिवलिंग छताला स्पर्श करील, त्या वर्षी प्रलय येईल असाही स्थानिकांचा समज आहे. महाराष्ट्रातले हे सर्वात मोठय़ा शिवलिंगांपैकी एक आहे हे निश्चित.
शिवमंदिराखेरीज या परिसरात कालिकामाता, शीतलादेवी, दक्षिणमुखी मारुती, उत्तरेश्वर, राम, दत्त, विष्णू इ. देवतांची स्वतंत्र लहान लहान मंदिरेही फेर धरून स्थापित दिसतात. या मंदिरांमधल्या काही मूर्तीही शिवलिंगाप्रमाणे प्राचीन असाव्यात असा तर्प व्यक्त केला जातो. दोन मोठाल्या दीपमाळा मंदिराचं सौंदर्य द्विगुणित करतात. महाशिवरात्री, श्रावणी सोमवार या दिवसांत या देवस्थानात भाविकांची दर्शनासाठी व रुद्राभिषेकासाठी रीघ लागलेली दिसते.
कोपिनेश्वर मंदिर प्रांगणात एक लहानसे, पण दुर्मिळ ग्रंथ भांडार असलेलं ग्रंथालयही आहे. इथे प्राचीन ग्रंथ, ऐतिहासिक पौराणिक दस्तऐवज, पोथ्या इ. अभ्यासक व इच्छुक वाचकांसाठी उपलब्ध असतात. आज ठाणे शहराचं ठळक वैशिष्टय़ असलेलं काwपिनेश्वर शहराच्या प्रमुख देवतांपैकी एक मानली जाते. ठाणे शहरात या मंदिराव्यतिरिक्त सिद्धेश्वर तलावाशेजारचं राममंदिर, घंटाळी भागातली घंटाळीदेवी, उथळसरचा उत्तरेश्वर, कोलशेतचं मरीआई मंदिर, नौपाडय़ाची गावदेवी इ. वारसा म्हणून महत्त्वाची अशी आहेत.
कोपिनेश्वराप्रमाणे ठाणे शहरापासून साधारण 30 किमीच्या अंतरात पूर्व, उत्तर व ईशान्य दिशांना अशीच महत्त्वाची कमीअधिक प्राचीन शिलाहारकालीन मंदिरं आहेत. पैकी एक अंबरनाथचे इ. स. 1060 मध्ये बांधून झालेले सुप्रसिद्ध अंबरेश्वर हे आहे. दुसरी दोन भिवंडी तालुक्यातलं लोनाडचं सोमेश्वर व कल्याण तालुक्यातील खिडकाळीचं खिडकाळेश्वर ही त्यामानाने लहानशी, पण शिलाहारांचं शिवप्रेम जतन करणारी सुंदर मंदिरं आहेत.





























































