तंत्र स्विंग ट्रेडिंगचे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण धोपट

मार्केट म्हटलं की, छोटेमोठे चढउतार ठरलेलेच असतात. मार्केट कधीच सरळ मार्गाने चढत किंवा उतरत नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मार्केटला जर शंभर पावलं चढायचं असेल तर ते दहा पावलं वर चढलं की, दोन-चार पावलं खाली उतरतं. कधी काही काळ सरळ रेषेत रेंगाळतं आणि पुन्हा वर जातं. हाच नियम आणि क्रम उतरत्या मार्केटलाही लागू होतो. नकळतपणे या छोट्यामोठ्या चढ-उताराचा झुला किंवा झोपाळा तयार होतो. त्यालाच स्विंग म्हणतात.

शॉर्ट आणि मीडियम टर्म प्राईस मुव्हमेंटमधल्या अशा संधी मिळवण्यासाठी ट्रेडर स्विंग ट्रेडिंगचा उपयोग करीत असतो. स्विंग ट्रेडिंगमध्ये काही दिवस किंवा काही आठवडे पोझिशन होल्ड केल्या जातात. दोन स्विंगमधल्या प्रॉफिटच्या संधी शोधल्या जातात.

स्विंग ट्रेडिंगचे टप्पे याप्रमाणे….  

ट्रेंड ओळखणे – मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करण्यापूर्वी ट्रेंड ओळखणे महत्त्वाचे असते. प्राईस चार्ट आणि टेक्निकल अनॅलिसीसच्या आधारे चढत्या मार्केटमध्ये हायर हाय आणि हायर लो शोधले जातात आणि उतरत्या मार्केटमध्ये लोअर हाय आणि लोअर लो आयडेंटिफाय केले जातात. ज्याला हे अचूक शोधता आले त्याला प्रॉफिट मिळवणं सोपं जातं.

स्विंग पॉइंट – ठराविक गतीतला झुला कधी मागे वळेल हे जसं अनुभवी नजरेला कळू शकतं, त्याचप्रमाणे कोणत्या पॉइंटपासून मार्पेट रिव्हर्स होईल हे अनुभवी ट्रेडरला कळू शकते. यातूनच ट्रेडरला एन्ट्री आणि एक्झिटचे संभाव्य पॉइंटस् मिळतात. दोन स्विंगमधल्या अंतरावरून पुढच्या स्विंगचा अंदाज बांधणंही सोपं जातं.

रिस्क मॅनेजमेंट – ट्रेडिंग करणे म्हणजे रिस्क मॅनेज करणे. स्विंग ट्रेडिंगच्या टेक्निकमुळे ट्रेडरला आपल्या प्रॉफिटची आणि लॉसची पातळी ठरवता येते. स्विंगच्या मर्यादेत आपल्या ट्रेडवर लक्ष ठेवता येतं आणि एन्ट्री एक्झिटसाठी तयार राहता येते.

स्विंग ट्रेडिंगसाङ्गी शिस्त हवीच, पण त्याच बरोबर पेशन्स आणि टेक्निकल अनॅलिसीसचे ज्ञानही आवश्यक असते. आपल्या भावनांवर अंकुश आणि ठरवलेल्या ट्रेडिंग प्लॅनवर विश्वास ठेवून तो अमलात आणण्याची तयारीही पाहिजे.

स्टॉप लॉस आणि प्रॉफिट लेव्हल – स्विंगनं तयार केलेली मर्यादा प्राईस कधी ओलांडणार नाही असं होत नाही. दोन स्विंगमधलं अंतर केवळ शक्यता तयार करीत असते. कधी ना कधी मार्कट स्विंग तोडून जाणार असतं हे नक्की. तरीही या स्विंगदरम्यान ट्रेडरला अपेक्षित प्रॉफिट आणि स्टॉप लॉसची लेव्हल ठरवता येते. वेळ, मर्यादा आणि शक्यता यांची सांगड घालता येते.

  (लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत.)