श्रीवासुदेवानंद सरस्वती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

महाराष्ट्रभूमीमध्ये श्रीदत्त संप्रदायाची नेमनियमांसह वैशिष्टय़पूर्ण आखणी करणाऱया एका महान योगसिद्ध सत्पुरुषाची चरित्रगाथा.

‘वासुदेवशास्त्राr अधिकारी सत्पुरुष आहेत’ असे सांगून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही श्रीदेवमामलेदार यांनी दिली. पुढे शास्त्राrबोवांच्या वाचासिद्धीची प्रचीती अनेकांना नित्यनेमाने येत असल्याने त्यांची प्रसिद्धी दिसामासाने वाढती झाली. श्री‘दत्त’देवही शास्त्राrबोवांशी अनेकदा संवाद साधत असत. त्यांना मार्गदर्शनही करीत असत. पुढे एकदा वासुदेवशास्त्राr नरसोबाच्या वाडीस गेले. तिथे त्यांची भेट श्रीगोविंदस्वामी या थोर दत्तसंप्रदायी सत्पुरुषाशी झाली. वाडी येथे वासुदेवशास्त्राRना श्रीगुरुचरित्र सप्ताह करण्याविषयी श्रीदत्तात्रेयांचा दृष्टांत झाला आणि याचदरम्यान त्यांना श्रीनृसिंह सरस्वतींचे साक्षात दर्शनही घडले. हा काळ शास्त्राrबोवांसाठी विलक्षण पुण्यदायी आणि बहारीचा होता.

वाडीहून माणगावी परतल्यावर वासुदेवशास्त्राRचे चित्त संसारात रमेना. ईश्वरप्राप्तीचा वाढता ध्यास अन् पापक्षालनाकरिता त्यांनी अतिशय खडतर असे ‘चांद्रायण’ व्रत केले. श्रीगुरुकृपेने व्रत यथासांग पार पडले. मात्र शास्त्राrबोवांची प्रकृती बिघडली. अंगातील शक्ती पार निघून गेली. त्यानंतर पुन्हा ते नरसोबाच्या वाडीस आले तेव्हा श्रीदत्तदेवांनी त्यांना स्वप्नदृष्टांताद्वारे मंत्रोपदेश दिला. मात्र पुढील सात वर्षे माणगाव येथेच काढावयाची आहेत असे स्पष्ट संकेत देऊन बोवांच्या मनातील संन्यास घेण्याच्या इच्छेला संमती दिली नाही. बुवा हिरमुसले आणि माघारी परतले. वाटेत कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यावर त्यांना दत्तमूर्ती विकत घेण्याची इच्छा झाली आणि त्यांची ती इच्छा अकल्पितरीत्या पूर्णदेखील झाली. शिवाय, माणगावी परतल्यावर दत्तमूर्ती स्थापन करण्यासाठी जागा आणि भक्तांनी केलेले सहाय्य यातून श्रीदत्तदेवस्थान उभे राहिले. येथे प्रतिवर्षी गुरुद्वादशी व दत्तजयंतीचा उत्सव होत असे तसेच हजारो भक्तांना अन्नसंतर्पणही होत असे. श्रींच्या पालखी सोहळ्याच्या वेळी अनेक पीडितांना आणि समस्याग्रस्तांना दिलासाही मिळत असे. माणगावच्या या श्रीदत्तदेवस्थानाची महती पंचक्रोशीच्याही पलीकडे पोहोचली. हे देवस्थान नरसोबावाडी देवस्थानाच्या अंतर्गत असल्याची शास्त्राrबोवांची भावना होती. येथील सर्वच उत्सव ते नित्यनेमाने साजरे करीत असत. त्यात कुचराई झालेली त्यांना खपत नसे. बोवांचे सोवळेओवळे, व्रतअनुष्ठाने शास्त्रमार्गानुसार चालत असत आणि त्यामध्ये काही उणीव राहिल्यास साक्षात श्रीदत्त (देव) दृष्टांताद्वारे वासुदेवशास्त्राRना त्याची जाणीव करवून देत असत.

माणगावी असतेवेळी देवांनी शास्त्राrबोवांना संस्कृत गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. शास्त्राrबोवांनी दोन हजार श्लोकांचे ‘द्विसाहस्री गुरुचरित्र’ लिहिले. येथून पुढे शास्त्राrबोवा आणि देवांचा एकमेकांशी नित्य संवाद सुरू झाला. दर खेपेस देवांनी शास्त्राrबोवांस काही सुचवावे किंवा बोवांनी काही कार्य करायचे ठरवल्यास देवांशी सल्लामसलत करावी हे जणू नित्याचेच बनले. देवांनी वासुदेवशास्त्राRचे अवघे आयुष्यच व्यापले आणि अनेकदा शास्त्राrबोवांची कठोर परीक्षा घेऊन माणगाव येथील आपले स्थान जागृत असल्याचेही प्रकट करून दाखविले.

दरम्यान, सात वर्षे पूर्ण झाली तेव्हा शास्त्राrबोवांना देवांनी माणगाव सोडण्याचे आदेश दिले. कसलाही विचार न करता बोवांनी पत्नी अन्नपूर्णाबाईंसह माणगाव सोडले अन् ते नरसोबावाडीत प्रवेश करते झाले. येथील दीर्घ मुक्कामात अन्नपूर्णाबाई प्रसूत झाल्या. मुलगा झाला. मात्र, जन्मतःच तो मरण पावला. याचदरम्यान वाडी येथील सत्पुरुष श्रीगोविंदस्वामी यांचेही निर्वाण झाले. शास्त्राrबोवांच्या मनात संन्यास घेण्याची तीव्र इच्छा उफाळून झाली. मात्र देवांनी ‘ही वेळ योग्य नसल्याचे’ सांगून बोवांना उत्तर दिशेस जाण्याची आज्ञा केली. बुवा पत्नी अन्नपूर्णाबाईंसह निघाले. कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी करीत ते गंगाखेड ग्रामी आले. येथे अन्नपूर्णाबाई मृत्युमुखी पडल्या. त्यांचे और्ध्वदेहिक पूर्ण केल्यानंतर 14व्या दिवशी शास्त्राrबोवांनी संन्यासाश्रम स्वीकारला. दुसऱयाच दिवशी गोदावरीच्या तीरावर एकाएकी अवतीर्ण झालेल्या एका संन्याशाने शास्त्राrबोवांना संन्यास दिला. काही काळानंतर देवांनी शास्त्राrबोवांना उज्जनी येथे नारायणस्वामी यांच्याकडे जाऊन दंड ग्रहण करण्याची आज्ञा केली. त्यानुसार ते उज्जनीस आले. नारायणस्वामींनी दंड देऊन बोवांचे सांप्रदायिक नाव ‘श्रीवासुदेवानंद सरस्वती’ असे ठेवले. श्रीवासुदेवानंदांना पहिला चातुर्मास उज्जनी येथे करण्याची आज्ञा देवांकडून प्राप्त झाली. माणगावच्या देवस्थानातून आणलेली श्रीदत्तमूर्ती व गरजेपुरते सामान सोबत घेऊन श्रीवासुदेवानंद सरस्वती सर्वत्र संचार करण्याच्या हेतूने पहिल्या चातुर्मासासाठी सज्ज झाले.

1857 च्या फसलेल्या बंडानंतर ब्रिटिशांचा अंमल वाढला. बेगडी सुधारणावाद जोपासणारी तथाकथित सुशिक्षित मंडळी प्रवाहपतित झाली. धर्मभ्रष्टता जोमाने वाढू लागली. वेदविद्येचे महत्त्व कमी झाले. धार्मिक कृत्यांविषयीचा अनादर वाढला. ही परिस्थिती धर्मधुरिणांच्या मनात चिंता उत्पन्न करणारी होती. म्हणूनच नारायणस्वामींनी वासुदेवानंद सरस्वतींना धर्मजागृती करणे आणि लोकांना धर्मशिक्षण देऊन सन्मार्गाकडे वळवणे हे उद्दिष्ट सोपवून हिंदुस्थानभ्रमण करण्यास सांगितले. गुरुआदेशानुसार वासुदेवानंदांनी उज्जयनी, ब्रह्मावर्त, हरिद्वार, हिमालय, पेटलाद, तिलकवाडा, नरसी, गिरनार, द्वारका, चिखलदरा, महत्पूर, बढवाई, नरसोबावाडी, तंजावर, हावनूर, कुरुगड्डी, पवनी आणि गरुडेश्वर येथे 23 चातुर्मास केले. होतकरू विद्यार्थ्यांना संध्या, ब्रह्मयज्ञादी नित्यकर्माचे शिक्षण देणे, ज्योतिष शास्त्र व वैदिक शास्त्र यांद्वारे लोकांच्या प्रापंचिक समस्या दूर करणे, देवदेवतांची स्तोत्रे रचून उपासना पंथाला बळकटी आणणे, हिंदू धर्मग्रंथाचे वैशिष्टय़ पटवून देणे, अनुग्रह देऊन धर्मकार्य करणाऱया शिष्यसमूहाद्वारे वैदिक धर्माचे महत्त्व प्रस्थापित करणे ही महत्त्वाची कार्ये वासुदेवानंदांनी चातुर्मास तसेच उर्वरित अवतारकार्यात अंगीकारली आणि शिष्यमंडळींकडून करवूनही घेतली. वासुदेवानंद सरस्वतींचे महत्त्वाचे कार्य श्रीदत्तसंप्रदायाला नेमनियम घालून देणे, दत्तसंप्रदायाचा प्रभावशाली विस्तार करणे हे होय. याचाच एक भाग वासुदेवानंदांनी दत्तचंपू, समश्लोकी गुरुचरित्र, श्रीदत्तमाहात्म्य, श्रीदत्तपुराण, श्रीसप्तशती गुरुचरित्रसार, श्रीदत्तभावसुधारस स्तोत्र, श्रीदत्तलीलामृताब्धिसार हे ग्रंथ तसेच घोरकष्टोद्धारक, प्रज्ञावर्धन यांसारखी दिव्य स्तोत्रे आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ यांसारखे अनेक दिव्य मंत्र रचले. श्रीवासुदेवानंदकृत समग्र वाङ्मय ‘सिद्ध’ असून त्याची प्रचीती आजही प्रत्येक दत्तभक्ताला नित्य येत असते. श्रीवासुदेवानंदांचे हे कार्य 1914 साली गरुडेश्वर येथे समाधिस्थ होईपर्यंत आणि त्यांच्या पश्चात सत्शिष्य दीक्षित महाराज, श्रीरंगावधूत, श्रीगुळवणी महाराज, श्रीनाना तराणेकर, श्रीगांडा महाराज यांच्या माध्यमातून आजही जोमाने घडत आहे. समकालीन सत्पुरुषांशी अपार स्नेहभाव राखलेल्या श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांचे डॉ. के. रा जोशी कृत ‘श्रीथोरले स्वामीमहाराज’ हे खंडात्मक समग्र चरित्र सर्व भक्तांनी अवश्य वाचले पाहिजे.

 [email protected]