लेख – अफगाणिस्तानात मागे राहिलेले संरक्षण साहित्य

>> सनत्कुमार कोल्हटकर

सध्या अमेरिकेत आणि इतर सर्व देशांमध्ये चर्चा आहे ती अमेरिकेने मागे सोडलेली शस्त्र्ाास्त्र्ाs आणि इतर संरक्षण साहित्य यांची. खाली उल्लेखलेले संरक्षण साहित्य अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये मागे ठेवलेले आहे. जर या शस्त्र्ाास्त्र्ाांचा उपयोग करता आला नाही, तर ती शस्त्र्ाास्त्र्ाs आणि उपकरणे तालिबान इतर देशांना विकू शकतो. चीन जर हे संरक्षण साहित्य तालिबानकडून विकत घेण्यात यशस्वी झाला तर तो त्याचा गेल्या अनेक वर्षांतील आवडता खेळ खेळण्यास सुरुवात करेल. अमेरिका आणि रशियाकडून यापूर्वी जे संरक्षण साहित्य चीनने विकत घेतले होते त्या सर्वांचे ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’ करून चीन त्याची प्रतिकृती बनवू शकतो.

तालिबानने इतर देशांना अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत घालून दिली होती. त्या मुदतीमध्ये अमेरिका, युरोप आणि इतर अनेक अफगाणिस्तानबाहेरील जवळ जवळ सर्व राष्ट्रांनी आपापले नागरिक आणि संलग्न लोकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढलेले आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्पह्टांमध्ये अमेरिकेचे काही सैनिक आणि काही नागरिकही मरण पावले. अफगाणिस्तानमधील अमेरिकेचा शेवटचा नागरिक सुखरूपपणे अमेरिकेत परत येईपर्यंत आम्ही काळजी घेऊ असे राणा भीमदेवी थाटात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे सतत सांगत होते, पण तरीही काही अमेरिकन लोकांचा बळी गेलाच. वर अमेरिकेत अशा मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन लोकांची ‘कोलॅटरल डॅमेज’ म्हणून नोंद केली जाते.

सध्या अमेरिकेत आणि इतर सर्व देशांमध्ये चर्चा आहे ती अमेरिकेने मागे सोडलेली शस्त्रास्त्रे आणि इतर संरक्षण साहित्य यांची. खाली उल्लेखलेले संरक्षण साहित्य अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये मागे ठेवलेले आहे. 2000 लष्करी गाडय़ा ज्यामध्ये ‘हमवीस’ या नावाने ओळखल्या जाणाऱया अवजड गाडय़ाही समाविष्ट आहेत. या गाडय़ा 1 लिटर इंधनामध्ये फक्त 1.5 किलोमीटर जातात. ‘ब्लॅक हॉक’ नावाने ओळखली जाणारी हेलिकॉप्टर्स, इतर छोटी विमाने, लष्कराकडून वापरली जाणारी चालकविरहित दूरनियंत्रित ‘ड्रोन’ आणि आधुनिक एम 16 एसॉल्ट रायफल्स. याबरोबरच रात्रीच्या अंधारात वापरले जाणारे चष्मे (नाईट व्हिजन गॉगल्स) आणि खांद्यावरून वाहून नेत्या येण्याजोगी क्षेपणास्त्र्ाs, बिनतारी संभाषणासाठी वापरली जाणारी यंत्रणा आणि संलग्न उपकरणे यात समाविष्ट आहेत. साल 2002 ते 2017 या 15 वर्षांच्या काळात अमेरिकेने 27 अब्ज डॉलर्स किमतीचे संरक्षण साहित्य अफगाणिस्तानला पुरविले होते. हे आकडे ‘रॉयटर्स ’ या प्रख्यात वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या बातमीपत्रातून घेतले आहेत. या खर्चामध्ये अफगाणी सैनिकांच्या प्रशिक्षणाचा समावेश नाही. त्यामुळे अमेरिकेची एकूण गुंतवणूक 50 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक झाली आहे. रिपब्लिकन सिनेटर्सनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याकडे अफगाणिस्तानमध्ये मागे ठेवलेल्या संरक्षण साहित्याचे तपशील मागितले आहेत.

ऑगस्ट महिन्यात अफगाणी लष्करातील प्रशिक्षित वैमानिकांनी 40 ते 50 लष्करी हलकी विमाने ( ए 29 सुपर टुकानो ) घेऊन अफगाणिस्तानबाहेर पळ काढला आणि उत्तरेकडील शेजारी देश उझबेकिस्तानमध्ये आश्रय घेतला. या घटनेनंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये राहिलेल्या उर्वरित प्रशिक्षित वैमानिकांना ठार मारल्याचे सांगितले गेले. अमेरिकेने मागे सोडून दिलेल्या या अमेरिका निर्मित संरक्षण साहित्यामुळे अमेरिकेत तेथील सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावर जोरदार टीका झाली आणि अजूनही होत आहे. आता या मागे सोडलेल्या संरक्षण साहित्याची दुसरी बाजूही आहे, जी दुर्लक्षित करण्याजोगी नाही. या शस्त्रास्त्रे मागे सोडून जाण्यामुळे प्रथमदर्शनी हा ‘भोंगळ’ कारभार वाटत असला तरी या कृतीमागे एक सबळ उद्देशही दिसून येतो.

जोसेफ वोटेल हे अमेरिकन सैन्यामधून जनरल पदावरून निवृत्त झालेले आहेत. जोसेफ वोटेल’ यांनी अमेरिकेच्या अफगाण मोहिमेमध्ये 2016 ते 2019 या काळात सक्रिय भाग घेतला होता. त्यांनी या विषयावर व्यक्त केलेले विचार खूप महत्त्वाचे आहेत. जी अतिप्रगत शस्त्र्ाास्त्र्ाs आणि ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर्स तालिबानच्या हाती लागली आहेत, त्या सर्वांची सतत देखभाल करावी लागते. या सर्वांना सुटय़ा भागांची गरज लागते. ही हेलिकॉप्टर्स उडविण्यासाठी संगणक आधारित ‘प्री प्रोग्रॅम्ड’ संरचना आणि ती वापरण्याचा अनुभव लागतो. त्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी ही हेलिकॉप्टर्स उडविण्याचा प्रयत्न केला तर काही गंभीर अपघात झाल्याचे येणाऱया काळात आपणाला दिसू शकेल. नाहीतर काही काळानंतर ही हेलिकॉप्टर्स आणि इतर संरक्षण साहित्य अफगाणिस्तानच्या ‘संग्रहालयात’ (म्युझियममध्ये) मांडावे लागेल. हॉवित्झर तोफा आणि त्याला लागणारे तोफगोळे यांची पुरेशी उपलब्धता असणेही यामध्ये आहेच. यापुढील काळात तालिबानला आर्थिक चणचण जाणवण्यास सुरुवात होईल हे सांगणे न लगे.

जर या शस्त्र्ाास्त्र्ाांचा उपयोग करता आला नाही, तर ती शस्त्र्ाास्त्र्ाs आणि उपकरणे तालिबान इतर देशांना विकू शकतो. ही उपकरणे विकत घेण्याची ऐपत आणि रस कोठल्या देशाला असू शकतो ? तर त्यासाठी प्रामुख्याने चीनचे नाव समोर येते. त्यापाठोपाठ रशियाचे नाव समोर येते. चीन पडेल किमतीमध्ये हे संरक्षण साहित्य तालिबानकडून विकत घेऊ शकेल.

या संरक्षण साहित्यापैकी अनेक इराकमध्ये अमेरिकेने मागे ठेवलेल्या संरक्षण साहित्याशी जुळणारे साहित्य आहे. ‘एम 16 असॉल्ट’ या आधुनिक रायफल्स मागे राहिल्या असल्या तरी त्यांचा वापर करण्यासाठी ‘बुलेट्स’ची (मॅगझिन्स) आवश्यकता आहे. या बुलेट्सचा अफगाणिस्तानमधील साठा संपला तर या रायफल्सचा उपयोग काय? परत अमेरिकेकडे जाऊन भीक मागण्याची सोय नाही. कारण अमेरिकेने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेकडे जमा केलेली 9 अब्ज डॉलरची रक्कम गोठवली आहे. युरोप आणि जागतिक बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या सर्वांनी अफगाणिस्तानचा आर्थिक पुरवठा रोखलेला आहे. पाकिस्तान हा पुरेपूर भिकेला लागला असल्याने त्यालाही अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये मागे सोडलेल्या संरक्षण साहित्याचा उपयोग नाही. तालिबान हे साहित्य पाकिस्तानला फुकट देण्याची शक्यताही बिलकूल नाही.

चीन जर हे संरक्षण साहित्य तालिबानकडून विकत घेण्यात यशस्वी झाला तर तो त्याचा गेल्या अनेक वर्षांतील आवडता खेळ खेळण्यास सुरुवात करेल. अमेरिका आणि रशियाकडून यापूर्वी जे संरक्षण साहित्य चीनने विकत घेतले होते त्या सर्वांचे ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’ करून चीन त्याची प्रतिकृती बनवू शकतो. या साहित्याचे भागन्भाग सुटे करून ते चीनमध्ये बनवून चीन त्याचा वापर करू शकेल. या ‘कॉपी पॅट’ काैशल्यात चीन फार प्रवीण आहे. फक्त ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर्स आणि इतर स्वयंचलित शस्त्र्ाास्त्र्ाs, ड्रोन्स यांचे संगणक आधारित ‘प्रोग्रॅम्स’ चीनला नव्याने बनवावे लागतील अथवा नवीन प्रोग्रॅम्स बनवावे लागतील. अमेरिकेने या शस्त्र्ाास्त्र्ाांच्या उभारणीमध्ये काही ‘गुप्त’ (सांकेतिक किल्ल्या) कीज स्वतःकडे ठेवल्या असतील तर त्या मिळविण्याशिवाय चीनला गत्यंतर नाही. जर चीनने याची मागणी अमेरिकेकडे केली तर अमेरिकेला अफगाणिस्तानमधील हे संरक्षण साहित्य चीनच्या हातात पडले आहे हे लक्षात येईल. त्यामुळे अमेरिका अवाच्या सवा भावात हे ‘प्रोग्रॅम्स’ चीनला विकू शकेल. येथे परत अमेरिकेचा व्यावहारिकपणा किंवा धंदेवाईकपणा दिसून येतो. जर या गोष्टी अमेरिकेला चीनच्या ताब्यात द्यायच्या नसतील तर तो चीनला नकारही कळवू शकतो. वर या यंत्रणा चालविता येऊ नयेत म्हणून ‘लॉक’ही करू शकतो. त्यामुळे तालिबान या संरक्षण साहित्याचा कितपत उपयोग करू शकतो की विल्हेवाट लावतो हे येणाऱया काळात स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या