मुद्दा – बालभारती संस्थेने जपला वसा

2003

>> प्रा. नयना रेगे

सध्या सुरू असलेल्या कोरोना या संक्रमित आजाराची परिस्थिती लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे शाळा-कॉलेजमधील वर्ग भरून शैक्षणिक वर्ष सुरू करणे हे खरे आव्हानात्मक तसेच कठीण झाले आहे. परिस्थितीनुसार बदल स्वीकारणे अपरिहार्य असतेच म्हणूनच वास्तविकता लक्षात घेऊन बालभारती संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बालभारती संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त हेमांग तन्ना यांनी काळाची गरज ओळखून सुमारे दोन महिने आधीच याची बांधणी 18 एप्रिलपासून सुरू केली. दिवसरात्र प्रचंड मेहनत घेऊन डिस्कॉर्ड या तंत्रप्रणालीद्वारे ऑनलाइन शिकविण्याचे तंत्र स्वतः शिकून संस्थेतील प्रत्येक शिक्षक, व्याख्याता, प्राध्यापक यांना शिकण्यासाठी मदत केली. प्रत्येक शिक्षकासाठी स्वतंत्र चॅनेल उपलब्ध करून दिले. त्यासाठी विविध प्रकारचे 14 ऑप्लिकेशन्स शोधून त्याचा उपयोग अधिक चांगले शिकवताना कसा होईल यावर भर दिला गेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चॅनेल आहे, जिथे त्यांना नोट्ससुद्धा मिळू शकतील. ऑनलाइन शिकविण्याचे तंत्र, त्याचे कौशल्य, परिणामकारकता कशी साधावी अशा गोष्टी सर्व शिक्षकांनी शिकून घेतल्या. मिळालेल्या लॉक डाऊन संधीचे सोने केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संस्थेच्या सर्व शिक्षकांनी आपापल्या घरी संगणकावर दोन महिने याचे तंत्र नीट शिकून आत्मसात केले. त्यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रणा विश्वस्त पुरवत आहेत. आजमितीला सर्व शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीत प्रावीण्य संपादन केले आहे. कोरोनाची कठीण परिस्थिती उद्भवली असतानादेखील केवळ विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील शैक्षणिक वर्ष वेळेवर म्हणजे 15 जूनपासून सुरू करून ऑनलाइन लेक्चर मोबाईलवर उपलब्ध करून दिले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याकरिता सर्रास वापरली जाणारी काही असुरक्षित ,चिनी मोबाईल ऍप टाळून चांगल्या प्रतीचे व सुरक्षित ऍप वापरण्यात आले आहे. बालभारती संस्था ही शिक्षण संस्था गेली अनेक वर्षे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी तसेच सेल्फ फायनान्स पदवी शिक्षण देत आहे. या संपूर्ण ऑनलाइन व्यवस्थेचा उपयोग बालभारती संस्थेमधील पदवी, ज्युनियर कॉलेज, सेल्फ फायनान्स या सर्व विभागातील-87 शिक्षक, पदवी व सेल्फ फायनान्स-1100 विद्यार्थी ज्युनियर कॉलेज- 1000 विद्यार्थी. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देऊन बालभारती संस्थेने हा वसा जपला आहे.

महाराष्ट्र तसेच गुजरातमधील शिक्षण संस्थांना जर ऑनलाईन शिक्षण सुरू करावयाचे असल्यास त्यासंबंधित तांत्रिक सहाय्य देण्यास सदर संस्थेचे व्यवस्थापकीय सदस्य, शिक्षक कटिबद्ध आहेत. याचा अधिकाधिक विद्यार्थी व शिक्षक यांना लाभ मिळावा हाच एकमेव हेतू आहे. कॅम्पस इन क्लाउडमार्फत ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. बालभारती संस्था इंडियन स्टार्ट अपशी संलग्न आहे. ‘द कॅम्पस इन क्लाऊड’ ही अत्यंत सुरक्षित प्रणाली आहे. यामध्ये कोणीही अपरिचित व्यक्ती प्रवेश करू शकत नाही. सर्व्हर आणि त्यातील माहिती ही सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने हॅकर्सपासून सुरक्षित आहे. बालभारती संस्था स्वतंत्रपणे लार्ंनग मॅनेजमेंट सिस्टम निर्माण करीत आहे

आपली प्रतिक्रिया द्या