नृत्यकलेचा उपासक हरपला, कथ्थकसम्राट पंडित बिरजू महाराज यांचे देहावसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कथ्थक हा शब्द जरी उच्चारला तरी ज्यांचे नाव समोर येते, ज्यांच्या रोमरोमांत अवघे नृत्य सामावले होते, अशा कथ्थक सम्राटाने आज एक्झिट घेतली. ख्यातनाम कथ्थक गुरू पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित बिरजू महाराजांनी आपल्या सर्वांगसुंदर नृत्याविष्काराने डोळय़ांचे पारणे फेडत या कलेत नवनवीन प्रयोग केले. कथ्थक नृत्याला दरबार- हवेलीतून बाहेर काढून अधिकाधिक लोकाभिमुख केले, घरोघरी पोचवले. अगणित शिष्य घडवले. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. कलेचा सच्चा उपासक हरपला, अशा भावना व्यक्त होत आहेत.

बिरजू महाराज यांना कीडनीचा त्रास होता. उच्च मधुमेहामुळे गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची नात रागिणी हिने दिलेल्या माहितीनुसार, अखेरच्या क्षणी आम्ही कुटुंबीय त्यांच्यासोबत होतो. काल रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही घरी अंताक्षरी खेळत होतो. कारण पंडितजींना जुन्या गाण्यांची आवड होती. अचानक त्यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात तीन मुली आणि दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यातील ममता महाराज, दीपक महाराज आणि जय किशन महाराज कथ्थक नृत्याच्या क्षेत्रातच कार्यरत आहेत. बिरजू महाराज यांच्यावर लोधी रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

हिंदी चित्रपटसृष्टीत योगदान

पंडित बिरजू महाराजांचे हिंदी चित्रपटसृष्टीलाही योगदान लाभले आहे. सत्यजीत रे यांचा ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटासाठी त्यांनी दोन गाणी गायली असून, त्यावर नृत्यदिग्दर्शनदेखील केले आहे. 2002 मध्ये आलेल्या ‘देवदास’ हा संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातील ‘काहे छेड छेड मोहे’ या माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ या दीपिका पदुकोणवर चित्रीत गाण्याचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यासाठी त्यांना 2016 सालचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. विश्वरुपम, देढ इश्किया, उमराव जान या चित्रपटांमध्येही त्यांचे योगदान आहे.

‘कलाश्रम’ मधून घडवले शिष्य

बिरजू महाराजांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे कालका बिन्दादीन घराण्यात झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे काका लच्छू महाराज व शंभू महाराज यांनी त्यांना नृत्याचे शिक्षण दिले. गुरूंकडून मिळालेली विद्या आणि असमान्य प्रतिभा यांच्या बळावर बिरजू महाराजांनी कथ्थक नृत्यात नवनवीन प्रयोग केले. त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते. ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे, याचे भान ठेवून बिरजू महाराज यांनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले.

नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा

कथ्थक सम्राट पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज म्हणजे नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. नृत्य, संगीत हेच त्यांचे आयुष्य होते. ते सर्जक कला उपासक होते. त्यांचे कलारसिकांच्या हृदयातील स्थान ध्रुव ताऱयाप्रमाणे अढळ राहील, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंडित बिरजू महाराज यांनी हिंदुस्थानी कलेला जगभरात विशिष्ट ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने अतीव दुःख झालंय. त्यांचे जाणे कलाजगतासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि शिष्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शरद पवार यांचा मेट्रो प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे मेट्रोतून प्रवास करत मेट्रोच्या कामाची पाहणी केली. शरद पवार यांनी सोमवारी सकाळी फुगेवाडी मेट्रो स्थानकाला भेट दिली. तिकीट काढून त्यांनी मेट्रोतून फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास केला. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.