कॉल अन् पुट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नरेश यावलकर, शेअर मार्केट मार्गदर्शक

मागील लेखांमध्ये आपण कॉल व पुट ऑप्शन्स म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेतलं. कॉल तसेच पुट विकत घेणारा काय विचार करतो हे समजले. आज कॉल विकणारा व पुट विकणारा कसा विचार करतो हे समजू या.

कॉल ऑप्शन्सः- जर मला वाटत असेल की, एका विशिष्ट भावाच्या वर शेअर्सचे  भाव वाढणार नाहीत, तर त्या स्ट्राइकचा कॉल  म्हणजे तो विकत घेण्याचा  अधिकार मी दुसऱ्यांना विकेन.

 तसेच जर भाव उतरेल  असे वाटत  असेल तर मी कॉल विकेन.

ऑप्शन्स विकणारा प्रीमियम घेतो, पण  त्याचबरोबर  जबाबदारी घेतो. म्हणजे बाजार वर जाणार नाही म्हणून कॉल विकला, पण बाजार वर गेल्यास मी जबाबदारी घेतली असल्याने मी अगोदरच घेतलेल्या प्रीमियमपेक्षा माझा तोटा जास्त किंवा अमर्याद होऊ शकतो.

पुट ऑप्शन्सः- एका विशिष्ट भावाच्या खाली शेअर्सचे   भाव उतरणार नाहीत असे वाटत असेल तर त्या स्ट्राइकचा  पुट म्हणजे तो विकण्याचा अधिकार मी दुसऱ्यांना  विकेन. तसेच जर भाव वाढणार आहेत  असे  वाटत असेल तर मी पुट विकेन, पण बाजार खाली गेल्यास जबाबदारी घेतली असल्याने मी अगोदरच घेतलेल्या प्रीमियमपेक्षा  माझा तोटा अमर्याद होऊ शकतो.

  12 जून रोजी एसबीआय भाव 581, मला वाटते  एक्सपायरी 29 जूनपर्यंत भाव 610 पर्यंत जाईल. त्यामुळे  मी कॉल विकत घेईन. मी 590 चा कॉल, ज्याची किंमत फक्त 6.80 आहे, म्हणजे मला फक्त रु. 10200  प्रीमियम / अधिभार विक्रेत्याला द्यावा लागेल (6.80 X 1500 लॉट). स्ट्राइक कोणता  घ्यायचा व इतर गोष्टी, ज्या महत्त्वाच्या आहेत, हळूहळू समजून घेऊ.

29 जून 2023 च्या करार समाप्तीचा 590 या स्ट्राइकचा कॉल विकत घेता म्हणजे विक्रेत्यासोबत तुम्ही असा करार करता की, तुम्ही दिनांक 29 जून 2023 ला (विशिष्ट तारखेला)  590 या भावाने (विशिष्ट भावामध्ये) एसबीआयचे 1500 शेअर्स विकत घेणार आहात. जरी  तुम्ही  शेअर्स  न  घेता  कॉल  घेत  आहात,  पण  वरीलप्रमाणे  विचार  केल्यास  तुम्हाला  कॉल  व  पुट  लवकर  समजेल.

करार समाप्तीच्या तारखेला नफा-तोटा  कसा असेल हे खालील उदाहरणावरून समजेल

वरील उदाहरणावरून असं दिसून येतं की…

एसबीआय  कितीही  खाली  गेला  तरी जास्तीत  जास्त  तोटा  मर्यादित  म्हणजे  फक्त  प्रीमियमएवढाच  आहे.

एसबीआय जितका  वर  जाईल  तितका  नफा  वाढेल  व  अमर्यादित  वाढू  शकतो

एसबीआय 581  वरून  समाप्तीच्या  तारखेला  596  वर  जाऊनसुद्धा  खरेदी  करणाऱ्यास  नफा  मिळत  नाही. त्यामुळे अनेकदा ऑप्शन्स खरेदी करणारे तोटय़ात असतात.

primetechnicals.com