>> शैलेश माळोदे
प्रा. गोवर्धन मेहता. ज्येष्ठ रसायनतज्ञ. उत्तम रसायनांच्या संयोगातून कल्पक विज्ञान जन्मते.
“1995 सालचा ऍलेक्झांडर वॉन टंबोल्ट संशोधन पुरस्कार मिळणारा मी प्रथम हिंदुस्थानी शास्त्र्ाज्ञ असलो तरी मला रसायनशास्त्र्ाांसाठी प्राप्त झालेलं शांती स्वरूप भटनागर पारितोषिक मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण ते मला माझ्या कार्यास लाभलेल्या आंतरराष्ट्रीय मान्यतेसाठी लाभलंय.’’ फ्रान्स सरकारतर्फे ‘लिजन्स डी ऑनर’ आणि जर्मनीद्वारे ‘क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट’ ही अत्यंत प्रतिष्ठत पारितोषिकं आणि लंडनच्या रॉयल सोसायटीतर्फे एफ.आर.एस. (फेलो ऑफ रॉयल सोसायटी) यांसारखे अनेक पुरस्कार प्रा. गोवर्धन मेहतांना लाभले आहेत. त्याविषयी बोलताना त्यांनी या परिच्छेदाच्या सुरुवातीचे उद्गार काढले.
तत्कालीन जोधपूर संस्थानात 26 जून 1943 रोजी जन्मलेले प्रसिद्ध रसायनशास्त्र्ाज्ञ असलेल्या प्रा. मेहतांचं पदव्युत्तर शिक्षण (बी. एस्सी. आणि एम.एस्सी.) राजस्थान विद्यापीठातून पार पडलं. त्यांनी पीएचडी पदवी सध्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (तत्कालीन पुणे विद्यापीठ) प्राप्त केली. 1999 साली ऑफिसर ऑफ ऑर्डर ऑफ अकॅडमिक पाम्स (फ्रान्स), 2004 साली लिजन्स डी. ऑनर हा नाईटहूड (फ्रान्स), 2003 साली एफ. आर. एस., 2016 साली ‘क्रॉस ऑफ द ऑर्डर मेरिट’, 2001 साली ‘पद्मश्री’ आणि 1995 मध्ये पी. सी. रे सुवर्णपदक प्राप्त झालेले प्रा. मेहता ऑरगॅनिक सिंथेसिस (कार्बनी संश्लेषण) क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. 1977 ते 1998 या काळात ते हैदराबाद विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 1994 मध्ये त्यांची नियुक्ती त्याच विद्यापीठाच्या कुलगुरूपदी करण्यात आली. 1998 ते 2000 या कालावधीत ते बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेत ऑरगॅनिक केमेस्ट्रीचे प्राध्यापक आणि संस्थेच्या संचालकपदी होते. 1997 साली त्यांनी आपलं करिअर मिशिगन स्टेट विद्यापीठापासून सुरू केलं. त्यानंतर ते ओहयो विद्यापीठातदेखील रिसर्च असोसिएट होते.
1969 साली हिंदुस्थानात परतल्यावर त्यांनी आय. आय. टी. कानपूरमध्ये व्याख्याता आणि सहा. प्राध्यापक म्हणून 4 वर्षे काम केलं. 1990 ते 2009 या काळात ते जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्चमध्ये मानद प्राध्यापक होते.2003 साली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स आय. आय. एस.मध्ये सेंटर फॉर कॉन्टेम्पररी स्टडीजमध्ये व्हिजिटर म्हणून मी दोन महिने संशोधन आणि पत्रकारितेचं काम केलं. तेव्हा त्यांची संचालक म्हणून भेट घेण्याची संधी लाभली होती. त्यानंतर काही वेळा विविध परिषदांतून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभली. 2005 मध्ये जुलै महिन्यात ते संचालक म्हणून निवृत्त झाल्यावर सीएसआयअस भटनागर फेलो म्हणून आयएस्सीत 2003 ते 2010 कार्य केले. 2006 ते 2012 या कालावधीत ते नॅकचे अध्यक्ष होते. 2009 साली भारत सरकारने त्यांना नॅशनल रिसर्च प्रोफेसरपदी नियुक्त केलं. 2006 साली अमेरिकन सरकारने मला व्हिसा नाकारला. परंतु त्यावर माझ्या देश-विदेशातील अगदी अमेरिकन शास्त्र्ाज्ञांनीदेखील टीका केली, असं प्रा. मेहतांनी हसत हसत सांगितलं होतं.
सुमारे 400 पेक्षा जास्त शास्त्र्ााrय निबंध नावावर असलेल्या प्रा. मेहतांना संशोधनाबरोबरच विज्ञान शिक्षणात खूपच रस आहे. त्याकरिता ते सतत विविध विद्यापीठांतून फिरत विद्यार्थ्यांशी संवाद साधत संशोधन करिअरसाठी प्रोत्साहित करीत असतात. ‘‘प्रा. सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मी पीएचडी केली. त्यांच्याकडूनच मी संशोधन आणि शिक्षणाची सांगड घालायला शिकलो. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात असतानाचा विविध महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पात काम करण्याची संधी लाभल्यास ते खूपच चांगल्याप्रकारे संशोधन कार्य पुढे नेऊ शकतील आणि उत्तम करिअर घडवू शकतील.’’ असं त्यांनी एकदा बातचित करताना मला सांगितलं.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सप्रमाणे विविध संस्थांत संशोधनास पुरेसं महत्त्व लाभायला हवं असं ते वारंवार सांगतात. केवळ सांगतात असं नव्हे, तर शिक्षणतज्ञ म्हणून ते 76 वर्षे पूर्ण होऊनदेखील सातत्यानं प्रयत्न करतात. 1992 ते 97 या काळात ते श्री निवासा रामानुजम रिसर्च प्रोफेसर होते. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीतील या कारकिर्दीनंतर ते त्या अकादमीचे अध्यक्ष झाले. ते रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशस्थ फेलो होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय शुद्ध आणि उपयोजित रसायनशास्त्र्ा संघटनेचे (IUPAC) देखील अध्यक्ष होते.
एच. के. फिरोदिया विज्ञान आणि तंत्रज्ञान पारितोषिकप्राप्त प्रा. मेहता अद्यापदेखील पूर्णवेळ काम करतात. विज्ञान प्रशासक आणि शिक्षणतज्ञ म्हणून त्यांचा अनुभव हिंदुस्थानमधील विविध नव्या संस्था आणि विद्यापीठांना प्राप्त होत आहेच. अलाहाबाद येथील हिंदुस्थानी माहिती तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती म्हणून ते 2011 पासून तर अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती म्हणून 2012 पासून कार्यरत आहेत. ते आयआयटी जोधपूरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी आहेत. त्याचबरोबर हिंदुस्थानी सांख्यिकी संस्था कोलकाताच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते मार्गदर्शन करीत आहेत. त्याचप्रमाणे इन्स्टिटय़ूट ऑफ लाइफ सायन्सेसच्या संचालक मंडळावरदेखील त्यांना नियुक्त करण्यात आलंय.
हिंदुस्थानमधील संशोधन आणि विकास कार्यावर जीडीपीच्या किमान दोन टक्के इतका निधी तरी खर्च व्हायला हवा, तेव्हाच हिंदुस्थानमध्ये संशोधनास पुरेसं महत्त्व प्राप्त होईल. संशोधन संस्कृती रुजेल आणि शिक्षणाची सांगड संशोधनाशी घातली जाईल. तेव्हाच हिंदुस्थान या विज्ञान क्षेत्रात एक महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहू शकेल, असं प्रा. गोवर्धन मेहता आग्रहानं सांगतात.
























































