ठसा – दादासाहेब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

सन 1950 मध्ये ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘रानमाणूस’ या पहिल्याच कथेपासून द. मा. मिरासदार यांच्या लेखन कारकिर्दीला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. त्यांच्या अनेकानेक कथा सामान्य वाचकांबरोबरच जाणकार समीक्षकांच्याही पसंतीची दाद मिळवून गेल्या आहेत. साहित्याच्या क्षेत्राप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या लेखणीचा संचार लक्षणीय ठरला आहे. कथासंग्रहांप्रमाणेच त्यांच्या पटकथा-संवादांनाही शासकीय पारितोषिकांचा सन्मान प्राप्त झाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. साहित्य वर्तुळात ‘दमा’ आणि ‘दादासाहेब’ या नावाने ते प्रसिद्ध होते.

मिरासदारांच्या व्यंपूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्पृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती.

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर असत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले. तसेच, अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती. ‘व्यंपूची शिकवणी’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून ‘गुरुपृपा’ हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. मराठी साहित्यिकांनी विनोदी वाङ्मयात ज्या अजरामर कथा लिहिल्या त्यात द. मा. मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ यांचा समावेश व्हायला हरकत नाही. ‘मिरासदारी’ या पुस्तकातली ‘भुताचा जन्म’ ही कथा प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय कथा बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठय़पुस्तकात घेतली आहे. द. मा. मिरासदार यांच्या ‘भुताचा जन्म’ या कथेवर बनलेली शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजली. ही कलापृती रोममध्ये होणाऱया फेस्टिव्हलमध्येही दाखवली गेली. द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे ‘मिरासदारी’ हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्पृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. द. मा. मिरासदार हे नेहमीच त्यांच्या मार्मिक आणि शैलीदार विनोदांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत. महाराष्ट्रातील विविध गावे आणि तिथे राहणारी माणसं आपल्याला नेहमी मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. ‘चकाटय़ा’मध्येही अशाच काही गावात आणि शहरात राहणाऱया अवली माणसाच्या आणि त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. फक्त शाब्दिक विनोद न करता प्रासंगिक विनोद लेखनातून वठवणे आणि साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे यातच लेखकाचे यश मानता येईल. ‘शिवाजीचे हस्ताक्षर’ ही कथा तर अप्रतिम. द. मा. मिरासदार यांना ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’, ‘पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला आहे.