
धूमकेतू किंवा शेंडे नक्षत्र. धूमकेतू म्हणजे धुराची पताका किंवा शेपटी असलेला आणि तारांगणात अचानक दिसणारा अनाहूत पाहुणा अशी धूमकेतूची पूर्वापार ओळख. एरवीच्या आकाशात न दिसणारं हे ‘नक्षत्र’ आकस्मिकपणे अवतरलं कुठून? या भयाने त्याला पूर्वी अशुभ समजलं जायचं. परंतु जगाच्या सर्व संस्कृतींमधल्या खगोल अभ्यासकांना त्याची माहिती होती. धूमकेतूंची निरीक्षणं पूर्वापार होत आली आहेत.
धूमकेतूसारखं येणं म्हणजे ‘अचानक’ उगवणं या संकल्पनेला अर्वाचीन काळातील खगोल निरीक्षणे आणि गणित अभ्यासांनी तडा गेला. उलट, धूमकेतू म्हणजे ठराविक काळाने निश्चित येणारी अवकाशस्थ वस्तू असल्याचं स्पष्ट झालं. ‘एन्के’ धूमकेतू दर साडेतीन वर्षांनी आपल्या सूर्यमालेला भेट देतो. मात्र तो प्रेक्षणीय नसल्याने त्याची आणि त्याच्यासारख्या अल्पकाळाने येणाऱया (शॉर्ट टर्म) धूमकेतूंची चर्चा कधी झाली नाही. 1973 मध्ये झालेला कौहुटेक धूमकेतू पाहिल्याचं आठवतं. तो दर 75 हजार वर्षांनी येतो.
धूमकेतूंच्या बाबती सर्वाधिक चर्चा झालेला धूमकेतू म्हणजे ‘हॅली’चा धूमकेतू. एडमन्ड हॅली या खगोल अभ्यासकाने 76 वर्षांच्या कालक्रमाने येणाऱया धूमकेतूचा शोध लावला. सेन्ट हेलेना येथे त्याने वेधशाळा उभारली. तेथून त्याने बुध ठाहाचं सूर्यबिंबापुढून होणारं अधिक्रमण पाहिलं. हॅलीचा काळ ‘1656 ते 1742’ असा आहे. त्यामुळे तोपर्यंत दुर्बिण अस्तित्वात आली होती. 1705 मध्ये त्याने ‘सिनॉप्सीस ऑफ द ऍस्ट्रॉनॉमी ऑफ कॉमेंट्स’ या शोध निबंधात 76 वर्षांनी येणारा एक धूमकेतू पुन्हा 1758 मध्ये दिसेल असं म्हटलं. ते खरं ठरलं पण तो पाहावयास हॅली हयात नव्हता.
1910 मध्ये ‘हॅली’चं नाव लाभलेला हा धूमकेतू आला. त्याआधी तो 1834 व 35 मध्ये दिसला होता. त्याचवर्षी (1835) मध्ये जन्माला आलेल्या मार्क ट्वेन या अमेरिकन विनोदी लेखकाने म्हटलं, ‘मी हॅलीच्या धूमकेतूबरोबर आलो आणि पुढच्या वेळी त्याच्याबरोबरच जाणार.’ त्याचं म्हणणं खरं ठरलं. ट्वेन 1910 मध्ये गेले. हॅलीचा धूमकेतू मात्र त्या वर्षी फारच सुंदर दिसला त्याच्या लांबच लांब शेपटीतून पृथ्वी पसार झाली. तेव्हाही युरोपात धूमकेतूविषयी भयगंड निर्माण झालाच होता. रुढीवाद्यांनी तो केला होता. परंतु तोपर्यंत फोटोठाफी सुरू झाली होती. संशोधक खगोल अभ्यासकांनी हॅलीचे अप्रतिम फोटो घेतले. इतके उत्तम फोटो घेतला गेलेला हा बहुधा पहिलाच धूमकेतू.
1985/86 मध्ये हा धूमकेतू पुन्हा दिसला आणि हॅलीचं भाकीत (गणित) खरं ठरलं. पण 1910ची मजा त्यात नव्हती. तो फारच अस्पष्ट दिसला. त्या निमित्ताने ‘खगोल मंडळा’सारख्या संस्था स्थापन होऊन खगोल अभ्यासाकडे, आकाश निरीक्षणाकडे जनसामान्यांचं लक्ष गेलं ही गोष्ट महत्त्वाची.
काही धूमकेतू खूपच लहान असतात. ते सूर्याच्या जवळ आले की सूर्याच्या उष्णतेने त्यांचे बाष्पीभवन होते. कारण त्यामध्ये केवळ बर्फ आणि धूळ असते. थोडे मोठे धूमकेतू सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या सपाटय़ात सापडून नष्ट होतात. त्यांना सन ठोझिंग धूमकेतू असं म्हणतात. ही संकल्पना जर्मन संशोधक हेन्री क्रूझ आणि अमेरिकन संशोधक डॅनियल कर्कवुड यांनी मांडली. पुढे 1979 पासून कोरोनॉठाफीक पद्धतीने अनेक हौशी खगोल अभ्यासकांनी अशा अनेक धूमकेतूंचा शोध लावला. खगोल मंडळाचे सलील मुळय़े आणि आणखी एक खगोल अभ्यासक शिशिर देशमुख यांनी अनेक सनठोझिंग धूमकेतू शोधले.
धूमकेतू कसे असतात, कुठून येतात? याची सविस्तर माहिती नंतर जाणून घेऊ. याविषयी आता लिहिण्याचं कारण म्हणजे सध्या आकाशात ऍटलास नावाचा धूमकेतू दिसत होता. दर 6 वर्षांनी हा धूमकेतू डिसेंबर 2019 मध्ये प्रथम दिसला. 23 मे ते 31 मे 2020 म्हणजे पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तो सूर्याजवळ येऊन चांगला दिसणार होता पण 2 एप्रिलपासूनच तो मंद दिसू लागला आणि त्याचं विघटन झालं.
यावरून आठवण झाली त कॅरोलि व युजिन शूमेकर आणि डेव्हिड लेव्ही यांनी शोधलेल्या 9व्या धूमकेतूची. 5 किलोमीटर व्यासाचा गोळा असलेला हा धूमकेतू सूर्यमालेत प्रविष्ट झाला तो 1993 मध्ये आणि गुरू ठाहाजवळ येताच त्या विशाल ठाहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो खेचला जाताना त्याचे अनेक तुकडे झाले. 16 ते 22 जुलै 1994 या काळात हे जळते तुकडे सेकंदाला 60 किलोमीटर वेगाने गुरूवर आदळले. हे दृश्य दुर्बिणीतून न्याहाळण्यासाठी आम्ही वांगणी येथे गेलो होतो. ‘नासा’च्या हबल दुर्बिणीने या धूमकेतूच्या अंताची छायाचित्र घेतली. त्यातीलच एक सोबत दिले आहेत. विश्वरचनेत तारे, ठाह, धूमकेतू आणि अनेक गोष्टी जन्म घेतात आणि कालौघात नष्टही होतात. ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ हा सिद्धांत विश्वरचनेतील अनेक गोष्टींना लागू होतो. ऍटलास धूमकेतूचे चार तुकडे झाले असून तो नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचा गाभा (कोमा) आता मंदावत आहे. धूमकेतूचे स्वरूप नेमके कसे असते व त्यांचा मूळ ठावठिकाणा पुढील लेखात वाचूया.






























































