
>> विशाल गोखले
यंदा आमच्या नवरात्रातील गृह महोत्सवाचे सलग 9 वे वर्ष होते. उत्तम दर्जाचे बांधकाम, शहरातील मोक्याच्या ठिकाणी साकारणारे गृह प्रकल्प, वेळेत ताबा आणि नवरात्रीच्या काळात सदनिकेची नोंदणी केली तर दरात मोठी सवलत अशा वैशिष्टय़पूर्ण बाबींमुळे आम्हाला नेहमीच ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी पहिल्या कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आमच्या मनात थोडी साशंकता होती, परंतु कोरोना काळातदेखील ग्राहकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. या वर्षी परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा सकारात्मक परिणाम घर खरेदीवर होत आहे. यंदा आम्ही निवासी गृह प्रकल्पांबरोबरच आमच्या कोथरूड येथील गोखले बिझनेस बे या व्यावसायिक संकुलातील जागादेखील सवलतीच्या दरात बुकिंगसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या, त्याला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकंदरीत या वर्षी आंम्हाला निवासी आणि व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्तम प्रतिसाद लाभला.


























































