आईस्क्रीम महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीवनी धुरी-जाधव

उन्हाळा म्हणजे… गारेगार आईस्क्रीम. आज पारंपरिक फळांसोबत अनेक डिझायनर आईस्क्रीम्स आली आहेत.

मे महिना म्हणजे मस्त आईसक्रीम…उन्हाने काहिली झालेल्या शरीराला आईक्रीमच्या थंडाव्याने शांत करायचे. नुसतं आईसक्रीम नाव काढलं तरी आपण विरघळून जातो…ते कोणाला आवडत नाही हे आश्चर्यच असेल. चिमुरडय़ांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत त्याच्या उच्चाराने तोंडाला पाणी सुटतं… आज मार्केटमध्ये आईसक्रीमचे अनेक फ्लेव्हर्स उपलब्ध आहेत. आईसक्रीमविषयी अधिक जाणून घेऊया शेफ दीपाली नवले-दुबे यांच्याकडून.

कोळसा आईसक्रीम, मसाला आईसक्रीम, पुरणपोळी आईसक्रीम असे एकापेक्षा एक सरस आईसक्रीम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ही आईसक्रीम तयार करण्याची संकल्पना कशी सुचते असे शेफ दीपाली यांना विचारले असता त्या सांगतात, मार्केटमध्ये सतत चढाओढ सुरू असते. त्यासाठी आपण बेस्ट कसे असू, आपण आईसक्रीममध्ये कोणता नवा फ्लेव्हर देऊ शकतो याच्या प्रयत्नात जो तो असतो. त्यातूनच नवीन नवीन आईसक्रीम फ्लेव्हर्स बनत जातात. परदेशात जास्मीन, लव्हेंडर या टेस्टला प्रचंड मागणी आहे, पण आपल्याकडे तसे नाही. आपल्याकडे ही टेस्ट आवडत नाही. मग ग्राहक आईसक्रीमकडे आकर्षित करण्यासाठी मिठाईचा टच देऊन आईसक्रीम तयार करतात. जे प्रयोग आईसक्रीमवर करता येतात ते प्रयोग कुल्फीवरही करता येतात. याबाबत त्या म्हणतात, कुल्फीवर बरेच प्रयोग करता येतात. आईसक्रीम कुल्फीमध्ये इसेन्स वापरले जातात. गाजर हलवा कुल्फी, पान कुल्फी, रसमलाई कुल्फी, गुलकंद कुल्फी, जिलेबी कुल्फी असे कुल्फीचे अनेक प्रकार आहेत. त्यातलात एक पान कुल्फी.

पान कुल्फी
बरेच लोक या कुल्फीत इसेन्स वापरतात, पण मी कुल्फीसाठी कोवळी खायची पानं घेते, ती क्रश करून त्याची पावडर करून घेते. त्यात मुखवास आणि नैसर्गिक रंग वापरून कुल्फीवर प्रयोग केले जातात.

चार प्रकारे आईसक्रीम तयार केले जाते
वेगवेगळी आईसक्रीम कशी तयार होतात, याबाबत त्या सांगतात आईसक्रीम बनवण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. परदेशात आईसक्रीम तयार करण्यासाठी अंडं वापरलं जातं. तर आपल्याकडे चार प्रकारे आईसक्रीम तयार केले जाते. l मिल्कमेडऔ दूधऔ मिल्क पावडर
l दूधऔ व्हिप्ड क्रीमऔ l व्हिप्ड क्रीमऔ मिल्क पावडर. l चौथे व्हिप्ड क्रीमऔ दूधऔ अंडं असे चार प्रकारचे बेस वापरले जातात. यापैकी आपल्याकडे व्हिप्ड क्रीमऔ मिल्क पावडरऔ दूध याचा बेस जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जातो.

आईसक्रीममध्ये अंडं
आईसक्रीममध्ये अंडं वापरणं गरजेचे असते का असे विचारले असता त्या सांगतात की बिलकुल नाही. आईसक्रीममध्ये अंडं गरजेचे नसते. आपल्या इथे आईसक्रीममध्ये अंडं वापरले जात नाही. परदेशात आईसक्रीममध्ये अंडं आवर्जून वापरले जाते. त्याचे कारण तिथलं तापमान आहे. तिथे जे प्रिझर्व्हेटिव्ह्स वापरले जातात त्यांना टिकवून धरण्यासाठी अंडं उत्तम पर्याय आहे.

एक ते तीन महिने टिकते
जी नॅचरल फळांची, फ्लेव्हर्ड आईसक्रीम आहेत ती टिकण्याच्या दृष्टीने मर्यादा असतात का याबाबत त्या सांगतात की, अजिबात मर्यादा नसतात. आईसक्रीम जास्त दिवस टिकण्यासाठी त्यात स्टेबिलायझर वापरले जाते. ताजी फळं वापरली जात असल्याने दुधाबरोबर त्याच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे आईसक्रीम साधारण एक ते तीन महिने डीप फ्रिजरमध्ये चांगले टिकते. पण तो असा पदार्थ आहे की त्यासाठी महिना काय अगदी दोन तीन दिवसात ते संपून जाते.

फिटनेस जपणाऱयांसाठी बरेच पर्याय
परदेशी आईसक्रीम कंपन्या आणि हिंदुस्थानी आईसक्रीम कंपन्या या दोन्हीबाबत काय सांगाल असा प्रश्न विचारला असता त्या सांगतात हिंदुस्थानी आईसक्रीम कंपन्यांमध्ये अंडं वापरले जात नाही त्यात दुग्धजन्य पदार्थ वापरले जातात. तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अंडं हे आईसक्रीमध्ये असतेच. त्याला आधी फोकस केले जाते. फिटनेस जपणाऱयांसाठी बरेच ऑप्शन आहेत. त्या आईसक्रीममध्ये दुधाऐवजी बदाम दूध किंवा सोया दूध वापरले जाते. तर साखरेसाठी कोकोनट साखर वापरली जाते, पण अशाप्रकारची आईसक्रीम्स फार कमी ठिकाणी मिळतात.

कितीही प्रयत्न केला तरी बाहेरच्या आईसक्रीमसारखे घरी आईसक्रीम होऊ शकत नाही, थोडा तरी त्यात फरक जाणवतो तर त्यावर त्यांनी सांगितले की खरंतर असं काहीच नाही. योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी घेतल्या तर मार्केटमध्ये मिळणाऱया आईसक्रीमचे हुबेहुब आइसक्रीम तयार होऊ शकते. घरच्याघरी हुबेहुब होईल असे मँगो सॉर्बे आईसक्रीम.

मँगो सॉर्बे आईसक्रीम
साहित्य- चार कप आंब्याच्या फोडी, चार ते पाच तुळशीची पाने, अर्धा कप मिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क.
कृती- आंबे कापून ते बंद पिशवीत आठ तासांसाठी डीप फ्रिझरमध्ये ठेवायचे. आठ तासाने फ्रिझर केलेल्या पिशवीतून फ्रोझन मँगो बाहेर काढायचे. मिक्सरच्या भांडय़ात ते घ्यावे. त्यात मिल्कमेड, चार-पाच तुळशीची पाने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. अगदी क्रीमी करायचे. ते क्रीम एका प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेऊन पुन्हा पाच ते सहा तासांसाठी डीप फ्रिझरमध्ये ठेवायचे. आईसक्रीम तयार!

[email protected]