जागर – ‘सावित्री’ आणि ‘महाराजा’ रेडिओ कॉलरिंगचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

>> सुनील लिमये >> निकित सुर्वे

बिबटे आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी योग्य सर्वेक्षणाचा आधार घेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सावित्री व महाराजा या बिबटय़ांना रेडिओ कॉलर बसवण्यात आल्या आहेत. हा रेडिओ कॉलरिंगचा प्रवास कसा असणार आहे हे सांगणारा लेख.

मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे यासारख्या घनदाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये जर बिबटय़ा विनासायास स्थानिकांना त्रास न देता फिरतात अशी चर्चा सर्वसामान्यांनी केली तर सर्वांनाच निश्चितच आश्चर्य वाटेल व हे कसे काय शक्य आहे, असा प्रश्नही अनेकांच्या मनात उपस्थित होऊ शकेल. वन विभागास हे माहीत आहे की, वन्यजिवांना जर आपण त्रास दिला नाही किंवा त्यांचे अधिवास क्षेत्रात आपण अतिक्रमण केले नाही तर ते आपल्याला त्रास न देता आपल्याबरोबर सहचर्याचे जीवन जगू शकतात. हे बिबटे एवढय़ा घनदाट मानवी वस्तीमध्ये कसे काय राहतात व हे बिबटे जंगल आणि मानवी वस्तींचा वापर कसा करतात, म्हणजेच ते एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी कसे जातात, मनुष्य वस्ती ते कसे टाळतात? मनुष्याबरोबरचा संघर्ष ते टाळतात किंवा कसे, या सर्वांचा अभ्यास करण्यासाठीच बिबटय़ांना रेडिओ कॉलर्स बसवून सर्वेक्षण करण्याचा 2 वर्षांचा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन, वाईल्डलाइफ कन्झर्व्हेशन सोसायटी व वाईल्डलाइफ कन्झर्व्हेशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने व काही कॉर्पोरेट सस्थांच्या मदतीने फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आला आहे.

अवकाशातील उपग्रहाद्वारे बिबटय़ांचा मागोवा घेऊन मग त्यांच्या ठिकाणाविषयी माहितीचा संदेश देणाऱया रेडिओ कॉलर्स पाच बिबटय़ांना बसवण्यात येणार असून त्याद्वारे या सर्वांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. दोन नर बिबटे आणि तीन मादी बिबटे अशा एकूण पाच बिबटय़ांना या दोन वर्षांच्या प्रकल्पाच्या कालावधीत रेडिओ कॉलर्स बसविण्याचे ठरले असून त्यापैकी दोन बिबटय़ांना Collars बसवण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पाची उद्दिष्टय़े खालीलप्रमाणे आहेत.

1. मानव-वन्यजीव एकमेकांशी कसे संबंध ठेवतात व एक दुसऱयाच्या उपस्थितीमध्ये कसे वागतात, याचा अभ्यास.
2. बिबटय़ा महत्त्वाचे रस्ते मार्ग, नद्या, रेल्वे रुळ, खाडय़ा, नाले, मानवी वस्ती आदी कशाप्रकारे ओलांडून प्रवास करतात?
3. हे बिबटे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व त्यालगतचा परिसर जसे उत्तरेकडील वसईची खाडी तर दक्षिणेकडील आरे का@लनी, फिल्म सिटी या परिसराचा त्यांच्या जीवनासाठी कसा वापर करतात?
4. या बिबटय़ाच्या सर्व प्रवासात त्याचा मानवाशी कमीत कमी संघर्ष व्हावा यासाठी प्रशासनाला माहिती व चांगल्या व्यवस्थापनासाठी सल्ला देणे हा आहे.

बिबटय़ा हा मूळचाच लाजाळू प्राणी आहे व त्याला भक्ष्य मिळण्याची खात्री असल्याने तो अत्यंत हुशारीने मानवी वस्तीजवळ राहत असतो त्याच्या अस्तित्वाचा व संचाराचा नियमितपणे शोध घेणे हे एक मोठेच काम आहे व त्यासाठीच या प्रकल्पाची आपणास खूप मोठी मदत होणार आहे. मानवाबरोबर सहचर्याचे जीवन जगण्यासाठी बिबटे आपल्या परीने खूप प्रयत्न करीत असतात हे बऱयाच जणांना सांगूनही पटणार नाही, परंतु जेव्हा त्यांच्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये मानवी जीवनाचा बळी पडतो तेव्हा मात्र कोणताही विचार न करता दोष मात्र आपण बिबटय़ावरच टाकतो. जर आपण मानव व बिबटे यांच्या संघर्षाची माहिती घेतली तर असे दिसून येते की, सन 2020 मध्ये एपूण 173 बिबटे मृत्युमुखी पडले असून त्यापैकी 85 नैसर्गिक कारणांनी, 64 विविध अपघातात (64 विविध अपघातांपैकी 29 वाहनांच्या अपघाताने, 25 विहिरीत पडून, 3 रेल्वे रुळ ओलांडताना व 7 इतर अपघातात), 17 शिकारीमुळे तर 7 विजेच्या तारांमधून धक्का बसल्याने मृत पावले आहेत तर हाच आकडा सन 2019 मध्ये 110 एवढा होता. या 110 पैकी 66 नैसर्गिकरीत्या, 35 विविध अपघाताने (वाहन अपघातात 17, विहिरीत पडून 10, तर इतर अपघाती कारणांमुळे 8) व शिकारीमुळे 9 मृत पावले आहेत. म्हणजेच सन 2020 मध्ये बिबटय़ांच्या मृत्यूचे प्रमाण हे सन 2019 पेक्षा वाढलेले आहे असे दिसून येते.

यात बिबटय़ांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. एपंदरीत बिबटय़ाच्या संख्येतही वाढ झाली असून दिवसेंदिवस त्याचा मनुष्याबरोबर होणारा संघर्ष हा त्याच्या अधिवासातील मानवामुळे होणाऱया बदलांमुळे वाढला आहे व या संघर्षात मनुष्याबरोबर बिबटय़ाचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी व या दोघांचाही मृत्यू कमी करण्यासाठी शासनाने बरेच उपाय योजले आहेत. जसे बिबटय़ाच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यास जनावरांच्या मालकांना व मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सानुग्रह नुकसानभरपाई देणे, स्थानिकांनी वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी जाऊ नये म्हणून जनजागृती करणे, स्थानिकांनी जळण गोळा करण्यासाठी जंगलात जाऊ नये म्हणून स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस देणे, वन्य प्राण्यांच्या मनुष्य वस्तीजवळील फिरण्यावर संनियंत्रण ठेवणे आदी बऱयाचशा बाबी वन विभागाने/शासनाने हाती घेतल्या आहेत. हे सर्व करीत असताना हाच बिबटय़ाचा संचार वनात व वनक्षेत्राबाहेर मानवी वस्तीत कसा व कोठे होतो, याबाबतची निश्चित अशी माहिती मात्र फारच कमी उपलब्ध आहे हे दिसून आले व त्यातूनच मोठमोठय़ा शहरांमध्ये जेथे दाट वस्ती आहे व जेथे बिबटय़ांचा संचार हा जास्त आहे अशा ठिकाणी या सर्वच बाबींचा अभ्यास करणे मात्र जरुरीचे असल्याने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

त्याच अनुषंगाने माहे फेब्रुवारी 2021 च्या पहिल्या आठवडय़ापासूनच वेगवेगळ्या चाचण्या घेऊन या प्रकल्पाची क्षेत्रीय कामांद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे. दि. 20 फेब्रुवारी 2021 ला ‘सावित्री’ या मादी बिबटय़ाला तर 22 फेब्रुवारी 2021 रोजी ‘महाराजा’ या नर बिबटय़ाला पकडून त्यांना अनुक्रमे जीपीएस व जीपीएम असलेले रेडिओ कॉलर्स लावण्यात आलेले आहेत. आता या दोघांचाही आतापर्यंतचा म्हणजेच एक महिन्याहूनही जास्त कालावधीतील प्रवास पाहता तर आपणही आश्चर्याने थक्क होऊन जाल.

आता आमच्या रेडिओ का@लरिंग प्रकल्पाला सुरुवात होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या महिन्याभरात आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मुंबईमध्ये हा प्रकल्प पहिल्यांदाच होत असल्याने आता पुढे काय काय पाहायला मिळणार याची आम्हा सर्वांना खूप उत्सुकता होती. सावित्री महाराजाचे (नर बिबटय़ा) का@लरिंग झाल्याबरोबर लगेचच दुसऱया दिवसापासून आम्ही त्यांच्या संनियंत्रणाच्या कामाला लागलो. सुरुवातीचा एक आठवडा संगणकाद्वारे दूरस्थपणे (रिमोट) समन्वय केल्यावर दुसऱया आठवडय़ापासून आम्ही प्रकल्प क्षेत्रात जायला लागलो आणि दोन्ही बिबटय़ांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवायला लागलो. ते किती वाजता उठतात, पुठे जातात, काय खातात, काय पितात, पुठल्या वाटा वापरतात, या सगळ्या गोष्टींचा माग ठेवून त्याची माहिती गोळा करायला लागलो. या काळात विशेषत्वाने जाणवली ती बाब म्हणजे, हे प्राणी किती सहजपणे जंगलांच्या हद्दी ओलांडतात! प्रकल्पाच्या सुरुवातीला आम्हाला या प्राण्यांच्या वेळापत्रकाचा बिलपुल अंदाज येत नव्हता. यामुळे अनेकदा आमची धांदल उडत असे, पण नंतर ज्याप्रमाणे एखाद्या आई-बाबांना आपल्या बाळाचे वेळापत्रक कळायला लागते त्याप्रमाणे हळूहळू आम्हालाही आमच्या दोन बिबटय़ांच्या वेळा समजायला लागल्या व जशीजशी माहिती मिळत गेली तशीतशी त्यांच्या आयुष्यातली अनेक गुपिते आमच्यासमोर उलगडत गेली.
यातीलच एक आश्चर्यकारक बाब म्हणजे, महाराजा केवळ सात दिवसांत 60-70 किलोमीटर चालून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात जाऊन परत आला होता. या दोन्ही संरक्षित क्षेत्रातील रेल्वे लाईन्स आणि रस्त्यांसारखे अडथळे या महाराजाने रात्रीच्या वेळीही सहजपणे पार केले होते. हे दोन्ही प्राणी दिवसा आराम करतात आणि रात्री जंगलात किंवा जंगलाबाहेर पुठे एखादा पुत्रा किंवा काsंबडी मिळते का हे शोधायला जातात. त्यांच्या मागावर असताना त्यांनी मागे सोडलेल्या पुराव्यांवरून आम्हाला त्यांनी कशा कशाची शिकार केली असेल हेही समजले.

एकंरीत आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून असे आढळून आले आहे की, हे दोन्ही बिबटे जंगलाबरोबरच मानव वस्तीतही तितक्याच सहजरीत्या भ्रमण करीत आहेत. वन्य प्राण्यांना मानव निर्मित हद्दी कळत नाहीत आणि ते त्या पाळतही नाहीत हे आम्हाला माहीत आहेच, पण आता पुढील काही महिन्यांत अजूनही बरीचशी आश्चर्यकारक माहिती आपणास मिळेल, तेव्हा थोडी प्रतीक्षा करा!

(सुनिल लिमये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आहेत. निकीत सुर्वे वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडियाचे वन्यजीव अभ्यासक आहेत)