दिशा – विचारांची कक्षा

>> विजय लाड

विचारांची सीमा ओलांडणे ही एक अविरत प्रक्रिया आहे. जी आपल्याला सतत शिकत राहण्यास, आपला दृष्टिकोन विस्तृत करण्यास आणि बदलत्या जगाशी जुळवून घेण्यास मदत करते. वाचन हा या प्रवासातील एक महत्त्वाचा सोबती आहे.

आपण वयाची वेस ओलांडतो. म्हणजेच वयाची कक्षा पुढे जात राहते. वयाप्रमाणेच आपल्या विचारांची कक्षाही रुंदावली पाहिजे.  आपले वय वाढते, आपण स्थलांतर करतो, पण केवळ शारीरिक किंवा भौगोलिक सीमा ओलांडणे पुरेसे नाही. खऱया अर्थाने आपल्या विचारांच्या सीमा (शहूत् ँदल्ह्गे) ओलांडणे अत्यंत आवश्यक आहे.

विचारांची सीमा म्हणजे आपल्या पूर्वग्रहदूषित कल्पना, रूढ विचार, संकुचित दृष्टिकोन आणि आपण स्वतभोवती आखून घेतलेल्या मानसिक मर्यादा. हे विचार आपल्याला एका विशिष्ट चौकटीत अडकवून ठेवतात, ज्यामुळे नवीन कल्पना स्वीकारणे किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहणे कठीण होते. हे अदृश्य बंधन आपल्या वाढीस आणि विकासाला प्रतिबंध करते.

विचारांची कक्षा रुंदावणे म्हणजे आपली संज्ञानात्मक लवचिकता वाढवणे. याचा अर्थ असा की, आपण नवीन माहिती स्वीकारण्यास, जुन्या विचारांना आव्हान देण्यास आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विचार करण्यास किती सक्षम आहोत. ज्या व्यक्तींमध्ये संज्ञानात्मक लवचिकता कमी असते, त्या बदल स्वीकारण्यास कचरतात आणि नवीन ज्ञान आत्मसात करण्यास प्रतिरोध करतात.

अनेकदा आपण अशा माहितीचाच शोध घेतो किंवा अशा विचारांनाच प्राधान्य देतो, जे आपल्या आधीच्या मतांना दुजोरा देतात. याला पुष्टीकरण पूर्वग्रह म्हणतात. विचारांची सीमा ओलांडण्यासाठी या पुष्टीकरण पूर्वग्रहाला ओळखून त्यावर मात करणे गरजेचे आहे. आपल्याला न पटणारे किंवा आपल्या विचारांच्या विरोधात जाणारे विचारही खुलेपणाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते.

 डॉ. कॅरल ड्वेक यांनी मांडलेली ‘विकासवादी मानसिकता’ ही संकल्पना येथे महत्त्वाची ठरते. ज्या व्यक्तींची मानसिकता विकासवादी असते, त्या आव्हानांना शिकण्याची संधी मानतात आणि अपयशातून शिकतात. याउलट, स्थिर मानसिकता (इग्xाd श्ग्हू्) असलेल्या व्यक्ती नवीन गोष्टींपासून दूर पळतात आणि आपल्या सध्याच्या विचारांनाच चिकटून राहतात. विचारांची वेस ओलांडण्यासाठी विकासवादी मानसिकता अंगीकारणे आवश्यक आहे.

नवीन विचारांना स्वीकारताना किंवा जुन्या विचारांना आव्हान देताना अनेकदा आपल्याला मानसिक अस्वस्थता जाणवते. आपली भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला या भावना समजून घेण्यास आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यास मदत करते. इतरांचे विचार स्वीकारताना किंवा स्वतच्या विचारांना बदलताना येणाऱया भावनिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी ही क्षमता आवश्यक आहे.

विचारांचे दुसरे जग गवसण्यासाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करायला हवे. विचारांचा वेस ओलांडायला मात्र विचारांचे दुसरे जग गवसायला हवे. मग त्यासाठी नवीन ज्ञानार्जन करावे लागेल. याकरिता सगळ्यात स्वस्त आणि परवडणारा मार्ग म्हणजे वाचन!

वाचन हे केवळ माहितीचे भांडार नाही, तर ते आपल्याला विविध दृष्टिकोन, संस्कृती आणि अनुभवांशी जोडणारे एक शक्तिशाली माध्यम आहे.

वाचनामुळे नवीन विचार प्रणालींचा परिचय होतो. आपण विविध लेखकांच्या, विचारवंतांच्या आणि संशोधकांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहू शकतो. विविध विषयांवरील वाचनामुळे आपली संवेदनशीलता वाढते आणि आपण सहानुभूतीपूर्वक इतरांच्या मतांचा विचार करू शकतो. वाचनामुळे आपण केवळ माहिती गोळा करत नाही, तर त्यावर चिंतन करतो, विश्लेषण करतो आणि स्वतचे मत तयार करतो, ज्यामुळे आपले समीक्षात्मक विचार कौशल्य वाढते. कादंबऱया, कथा आणि विज्ञान-कल्पना वाचल्याने आपली कल्पनाशक्ती वाढते आणि आपण नवीन शक्यतांचा विचार करू शकतो.

वाचलेले विचार आचारातून दिसणे महत्त्वाचे

वाचाल तर वाचाल याप्रमाणे वाचलेले विचार आचारातून दिसायला हवेत. नाहीतर त्यात साचलेपणा येऊन त्याचे डबके होईल. किंवा पालथ्या घडय़ावर पाणी असे तरी होईल.

आपण कितीही वाचले किंवा कितीही नवीन विचार आत्मसात केले, जोपर्यंत ते आपल्या कृतीत दिसत नाहीत, तोपर्यंत त्यांना खरा अर्थ प्राप्त होत नाही. मानसशास्त्रात याला ज्ञान-वर्तन दरी (ख्हदैता्-ँाप्aन्ग्द उaज्) असे म्हणतात. केवळ माहिती असणे पुरेसे नाही; त्या माहितीचा उपयोग करून आपल्या वागणुकीत बदल घडवणे आवश्यक आहे.

ज्याप्रमाणे डबक्यात साचलेले पाणी दुर्गंधीयुक्त होते किंवा पालथ्या घडय़ावर पाणी ओतल्यास ते वाया जाते, त्याचप्रमाणे कृतीविना विचारही निष्फळ ठरतात. नवीन विचार आत्मसात करणे ही केवळ एक सुरुवात आहे; त्या विचारांना आपल्या जीवनाचा भाग बनवून त्यानुसार कार्य करणे हे खऱया परिवर्तनाचे लक्षण आहे.

विचारांची सीमा ओलांडणे ही एक अविरत प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपल्याला सतत शिकत राहण्यास, आपले दृष्टिकोन विस्तृत करण्यास आणि बदलत्या जगाशी जुळवून घेण्यास मदत करते. या मानसिक सीमा ओलांडूनच आपण एक अधिक प्रगतीशील, संवेदनशील आणि सक्षम व्यक्ती बनू शकतो.