सरदार पिलाजीराव जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरदार पिलाजीराव जाधवराव हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सेनापती, सुभेदार आणि श्रीमंत पेशवे बाजीराव व चिमाजी आप्पा यांचे युद्धशास्त्रातील गुरू होते. ते राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज होते. इ.स. 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या सुटकेच्या आणि सत्तासंपादनाच्या मोहिमेतील ते अग्रगण्य सरदार होते. पालखेडची लढाई, वसईची मोहिमेत हुजुरात मोर्चाचे नेतृत्व, तसेच मालवा, बुंदेलखंड आणि दिल्लीपर्यंतच्या मराठा मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. बाजीराव-पेशव्यांच्या उत्तर आणि दक्षिण भारतातील मोहिमांमध्ये ते मराठा सैन्याची मुख्य ताकद होते. त्यांनी बाजीराव पेशवे आणि चिमाजी आप्पा यांना युद्धशास्त्र शिकवले होते. पुणे जिह्यातील वाघोली गावामध्ये श्री वाघेश्वर मंदिर आणि तलावाजवळ स्थित आहे. ही चार खांबांची आणि घुमटाकार छत्र-समाधी (स्मरण छत्री) मराठा वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे.