ठसा – शांता नारकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. धनंजय दळवी

न्यू इंग्लिश स्कूल आणि गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख आणि ख्यातनाम मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा श्रीमती शांता विजय नारकर यांचे दुःखद निधन झाले.

शांता नारकर शाळेतील शिक्षिका म्हणून कडक शिस्तीच्या, स्पष्टवक्त्या, अभ्यासू, उत्तम वक्त्या. मराठी, हिंदी, संस्पृत या तीनही भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा केल्यानंतर मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण करून त्या निवृत्त झाल्या. शाळा आणि मातृमंदिरचे कार्य यांचा समतोल त्यांनी नेहमी सुव्यवस्थितपणे सांभाळला. शाळेतील निवृत्तीनंतर बाईंनी मातृमंदिरच्या कार्यात स्वतःला झोपून दिले.

शांताताईंचा स्त्री किंवा महिला हा जिव्हाळ्याचा विषय होता. महिलांचे स्वावलंबन, सबलीकरण आणि सक्षमीकरण, प्रगती आणि विकासासाठी त्या सातत्यपूर्ण प्रयत्नशील होत्या. मातृमंदिर संस्थेबरोबरच मातृमंदिर महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, कष्टकरी महिला सभा, मातृमंदिर गृहनिर्माण सहकारी संस्था इत्यादी संस्थांच्या उभारणीतून महिलांच्या उत्कर्षाबरोबरच बालवाडय़ा-पाळणाघरे, किशोरी विकास प्रकल्प, महिला बचत गट, मुली व महिलांसाठी आरोग्य शिबिरे, पाणीपुरवठा योजना, महिलांचे सामुदायिक शेती प्रकल्प, समाजमंदिराची बांधणी, वनीकरण लागवड प्रकल्प, महिलांचे मेळावे, पिठाची गिरणी योजना असे नानाविध उपक्रम-कार्यक्रम बाईंनी राबवले.

मातृमंदिर महिला औद्योगिक उत्पादक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जी अभिनव त्रिसूत्री राबवली ती प्रशंसनीय होती. तालुक्यातील महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनावे यासाठी वनाली, हस्ताली आणि मनाली ही ब्रँड संकल्पना अस्तित्वात आणली. या त्रिसूत्रीतील वनाली म्हणजे स्थानिक वनातील व बागेतील फळांना आणि फळ प्रक्रिया उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न केले गेले. मातृमंदिर औद्योगिक संस्थेने ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी फळ प्रक्रियेचे मोफत प्रशिक्षण देऊन बाजारपेठ उपलब्ध करून दिली. मातृमंदिर औद्योगिक संस्थेने स्थानिक फळांवर प्रक्रिया करून सरबत, लोणची, मुरंबे, जाम, जेली, चटण्या, फळांच्या सुपाऱया इत्यादी नावीन्यपूर्ण पदार्थ बाजारात आणले. करवंद, सुपारी व सरबत, कच्च्या पपईची गोड वडी, इन्स्टंट पिठे, विविध चवीचे मसाले यांना वनालीने ओळख मिळवून दिली. शेतकऱयांची व कष्टकऱयांची फळे संस्थेने विकत घेऊन स्थानिकांना रोजगारही दिला. संस्थेचा दुसरा ब्रँड हस्ताली. यामध्ये कापड, रेक्झिन, लोकर यापासून तयार कपडे, पिशव्या, शोभिवंत वस्तू, पर्स, बॅग यांचे मोफत प्रशिक्षण गरजू युवक-युवतींना देऊन त्यांच्या तयार वस्तू विकण्याची हमी संस्थेने स्वीकारली, तर तिसरे ब्रँड नेम मनाली हे होते. मनालीने दहावी नापास झालेल्या मुलींना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी संसारशास्त्र्ा ते प्रगत संगणकाचे ज्ञान देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. अनेक मुलींनी जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा शिक्षणात गती मिळवली, तर काहींनी आपल्या आवडत्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. या प्रकल्पातून पुढे आलेल्या युवती सामाजिक कार्य, नार्ंसग, टेलरिंग, पार्लर, विविध प्रकारची दुकाने चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

कष्टकरी महिला सभेच्या माध्यमातून शांताताईंनी आपल्या ओळखीने नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. वनाज इंजिनीअरिंग लिमिटेड या कंपनीत महिलांना अनेक वर्षे रोजगार उपलब्ध झाला होता. मातृमंदिर गृहनिर्माण संस्थेने गरीब व गरजू व्यक्तींना स्वतःच्या मालकीचे घर मिळवून देण्यास सहकार्य केले. शांताताईंच्या सहकार्याने संगमेश्वर तालुक्यात खेडोपाडी महिला मेळावे घेऊन महिलांच्या सामाजिक गरजा, पंचायत राज प्रशिक्षण, वनीकरण याविषयीची जागृती, पाणीपुरवठा योजना, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. किशोरी विकास प्रकल्पांतर्गत मुलींच्या शारीरिक व मानसिक विकासाबरोबर स्वसंरक्षणासाठी विविध मेळावे, कार्यशाळा, निवासी शिबिरे यांचे मोफत आयोजन केले. पीडित मुली व महिलांसाठी मोफत कायदेविषयक सेवा केंद्र चालविले. संगमेश्वर व लांजा तालुक्यात गावोगावी अनेक महिला बचत गटांची स्थापना केली. महिलांनी बचत गटामार्फत स्वावलंबी व्हावे यासाठी आर्थिक मदत व व्यावसायिक मार्गदर्शन पुरविले. दुर्गम भागात काही ठिकाणी पिठाची गिरणी सुरू करण्यासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन केले.

शांताबाईंच्या धडपडीतून अनेक मुली व स्त्रियांना जगण्याची नवीन उमेद मिळाली. अनेकींना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. आज त्या यशस्वितेची उंच भरारी घेत आहेत. त्यातून अनेक पुटुंबे स्थिरावली, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनली. जीवनरूपी प्रवासाच्या वाटेवर अनेकींना दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशाची आस दाखवणाऱया शांताताईंचे कार्य सामान्यांसाठी अतिसामान्य ठरले.