
>> अजित कवटकर
वन्य जीव व त्यांच्या अधिवासाचे प्रामाणिकपणे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी जनजागृतीची विशेष आवश्यकता आहे. आपण व आपली पृथ्वी त्यांच्यावर कसे व किती निर्भर आहोत, ही वास्तविकता प्रत्येकाला समजवणे, पटविणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांतील अभ्यासक्रमात या विषयाला प्राधान्य दिल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंबंधीची एक मोहीम मनामनावर वन्य जीव संवर्धनाचे संस्कार करू शकते.
मानवाच्या अस्तित्वाला व उत्क्रांतीला वन्य जीवसृष्टीचे योगदान हे नक्कीच मोठे होय, परंतु आज मात्र मनुष्य स्वतःच्या स्वार्थी विकासासाठी त्याच मुक्या जीवांच्या व त्यांच्या आधिवासाच्या अस्तित्वावर उठला आहे. उद्योग-व्यापार व विकासाच्या अनुषंगाने का होईना, परंतु निसर्गाच्या बाबतीत असंवेदनशील असणाऱया आपल्या व्यावहारिक कृती या आज पर्यावरणातील अनेक वन्य जीव परिसंस्थांसाठी विध्वंसक ठरत आहेत. विलुप्त झालेल्या अनेक प्रजाती आणि दुर्मिळ होण्याच्या मार्गावर असलेल्या इतर अगणित यांस मानवाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हस्तक्षेप हा प्रामुख्याने जबाबदार आहे. वन्य सृष्टीतील नैसर्गिक वनस्पती व प्राणिसंपदेचा मानवनिर्मित आर्थिक व सामाजिक पर्यावरणावर होणारा विस्तृत व सकारात्मक प्रभाव लक्षात घेता वन्य जीवांचे व त्यांच्या नैसर्गिक वसतिस्थानांचे संवर्धन होणे हे शाश्वत विकासासाठी अपरिहार्य आहे.
आपले जीवन हे या जीवावरणातील प्रत्येक घटकात होणाऱया आंतरक्रियांवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांपासून विलग होऊन जगणे वा विकास करणे शक्य नाही. हे परस्परावलंबन स्पष्ट असतानादेखील मानवाने नैसर्गिक संसाधनांचे सुरू ठेवलेले अमर्याद शोषण हे आपल्या वसुंधरेची आणि त्यावरील वन्य जीवांची अपरिमित हानी करत आहे. नष्ट झालेल्या वा होऊ शकणाऱया असंख्य प्रजाती याला मानवाचे स्वार्थी, आत्मकेंद्री उपक्रम जबाबदार आहेत. मनुष्य हा जैवविविधतेचा जणू शत्रू होऊ पाहत आहे. आज जागतिक तापमानवाढीचा वन्य जीवसृष्टीवर होत असलेला परिणाम हा सर्वात भयानक होय. त्यामुळे अनेक नाजूक परिसंस्था व त्या विशिष्ट वातावरणावरच जगण्यासाठी निर्भर असलेल्या अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होत आहेत. त्याशिवाय चोरी व अवैध शिकारी यांतून वन्य जीवांचा होणारा अब्जोंचा व्यापार, प्रदूषणाचा आघात, आक्रमक प्रजातींचे अतिक्रमण, निर्वनीकरण वगैरेंसारख्या समस्या आज वन्य जीव नैसर्गिकतेला अपायकारक ठरत आहेत. याचे गंभीर परिणाम हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्याच अस्तित्वावर उलटण्याची शक्यता दाट वाटू लागली आहे.
जगाची फुप्फुसं समजल्या जाणाऱया आणि पृथ्वीला जवळ जवळ 20 टक्के ऑक्सिजन साठा पुरविणाऱया अॅमेझॉन वर्षावनांमध्ये एकटय़ा सन 2019 मध्ये लागलेल्या आगीत बावीस लाख एकरांहून अधिक जंगल क्षेत्र जळून खाक झाले. जगाच्या पाठीवर पुठेच एवढी जैवविविधता नाही जेवढी तिथे आहे. आजपर्यंत जगातील अर्ध्याहून अधिक जंगलं मिटवली गेली आहेत आणि उरलेल्यांवर लागलेले डोळे पाहता त्यांचे रूपांतर मानवी जंगलांमध्ये होण्यास वेळ लागणार नाही. मानवाच्या अमर्याद अतिक्रमणाला वेळीच आवरले नाही, तर ही वन्य जीवसृष्टी समाप्त होईल. असे सगळे उद्ध्वस्त करून आपल्याला सुखाने जगता येईल का? आर्क्टिक प्रदेशांसारखे दुर्गम भागदेखिल आज प्लॅस्टिकच्या समस्येने त्रस्त आहेत. यावरून मानवनिर्मित प्रदूषणाचा घातक प्रसार हा पृथ्वीच्या कानाकोपऱयापर्यंत झाला असल्याचे दिसून येते. जी रसायनं आपण महासागर व मातीच्या पोटात ढकलत असतो, तीच रसायनं अन्नसाखळीतून पुढे आपल्याच पोटात येऊन जीवघेणी ठरत आहेत याचेदेखील भान आपण हरवून बसलो आहोत. पर्यावरण, वन्य जीव यांविषयीची असहिष्णुता आपल्याला तर मारक ठरतच आहे, परंतु ती त्या मुक्या जीवांच्या सर्वनाशाला अधिक कारणीभूत ठरू पाहत आहे.
प्रतिष्ठेची चिन्हं म्हणून दुर्मिळ वन्य जीवांना चोरून पाळणे, त्यांच्या कातडय़ांपासून वा अवयवांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करणे वगैरेंसारख्या हौशी लोकांनी जाणीवपूर्वक टाळल्या तर अगणित जीवांचे प्राण वाचतील. प्लॅस्टिक जणू वन्य जीवांच्या गळ्याभोवतीचा फास बनू पाहत आहे. जलचरांवर प्लॅस्टिकमुळे ओढवलेले संकट किती मोठे आहे हे निरंतर उद्ध्वस्त होत असलेल्या जल परिसंस्थांच्या आकडेवारीवरून पाहायला मिळेल. त्यामुळे ‘प्लॅस्टिक बंदी’ ही आज जगापुढील सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे. निरंतर व अमर्याद कार्बन उत्सर्जनामुळे बळावलेले ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि त्यामुळे अनुभवास येणारा वातावरणातील बदल हा वन्य जीवांच्या प्रत्येक जैविक क्रियेवर नुकसानकारक परिणाम करत आहे. असे असूनदेखील हे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात प्रत्येक राष्ट्र अपयशी ठरत आहे. रेल्वे-रस्ते अपघातात, शेताभोवती पुंपण म्हणून गुंडाळेल्या विद्युत तारांमध्ये अडपून, मनुष्य – प्राणी संघर्ष यात बळी पडणाऱया वन्य जीवांची आकडेवारी ही वर्षागणिक वाढतच आहे. मनुष्याने प्राण्यांच्या अधिवासात केलेल्या शिरकावाचे हे परिणाम होय. निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर, नदीकिनारी, जंगलाशेजारी ‘वीपेंड अथवा सेपंड होम’ उभारण्याची आलेली फॅशन ही बेसुमार वृक्षतोडीस आणि त्यातून वन्य जीव अधिवास नष्ट होण्यास कारणीभूत ठरत आहे.
पर्यावरणस्नेही पद्धतीची अनिवार्यता ध्यानी ठेवून विकासकामांचे नियोजन व नियम केल्यास औद्योगिक विकास व पर्यावरण हे परस्परविरोधी राहणार नाही. तसे झाल्यास मानवाची आर्थिक व सामाजिक प्रगती ही पर्यावरण व वन्य जीव संवर्धनास सहायक, पोषक ठरू शकेल. वन्य जीवांचे वसतिस्थान असलेल्या जंगलाला मधोमध कापत जाणारा वाहतूक मार्ग हा प्राण्यांच्या फिरण्यावर मर्यादा आणत त्यांचे संचार क्षेत्र अधिकाधिक संपुचित करतो. त्यामुळे प्राण्यांच्या स्थलांतर प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो व ज्याचा अपायकारक परिणाम त्यांच्या सर्वांगीण विकासावर, प्रजननावर, संख्यावाढीवर दिसून येतो. ठिकठिकाणी हरित उड्डाणपूल निर्माण करून काही देशांनी या समस्येवर मिळविलेल्या समाधानातून असे दिसून आले आहे की, आधुनिक प्रगती व वन्य जीव संवर्धन यांच्यात योग्य संतुलन राखून शाश्वत विकास करणे शक्य आहे. खारफुटी, पाणथळ जमीन क्षेत्र हे जैवविविधतेचे भांडारघर समजले जातात, परंतु समुद्र किंवा नदीकिनाऱयालगत असलेला हा प्रदेश आज अतिक्रमणाला बळी पडत आहे. नाजूक व संवेदनक्षम असणारे येथील वन्य जीव नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी हे प्रदेश संरक्षित करणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करता तेथील लोकांना याचा होणारा फायदा व मिळणारे संरक्षण हे कैक पटीने अधिक आहे.
वन्य जीव व त्यांच्या अधिवासाचे प्रामाणिकपणे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी जनजागृतीची विशेष आवश्यकता आहे. आपण व आपली पृथ्वी त्यांच्यावर कसे व किती निर्भर आहोत, ही वास्तविकता प्रत्येकाला समजवणे, पटविणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांतील अभ्यासक्रमात या विषयाला प्राधान्य दिल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल. उद्योगसमूहांनी आपल्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’अंतर्गत वन्य जीव संवर्धनाकडे संसाधनं वळविल्यास आजपर्यंत झालेली हानी काही प्रमाणात नक्कीच भरून काढता येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंबंधीची एक मोहीम मनामनावर वन्य जीव संवर्धनाचे संस्कार करू शकते.





























































