LIVE : अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक, पंतप्रधान मोदी भेट घेण्याची शक्यता

1569
फाईल फोटो

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या तब्येतीत अद्यापही सुधारणा झाली नसून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज रविवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी जेटली यांची एम्स रुग्णालयात जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे. आजच ते भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून परतले आहेत.

  • पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा एम्समध्ये जेटलींची भेट घेण्याची शक्यता
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह एम्समध्ये दाखल, अरुण जेटलींचे घेतली भेट
  • सरसंघचालक मोहन भागवत एम्समध्ये दाखल

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेटली भेट घेतली

जेटली यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 9 ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांच्या तब्येतीत चढ उतार होत असल्याने डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. शुक्रवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही जेटली यांना भेटण्यास गेले होते. तर रात्री 12 च्या सुमारास अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जेटली यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

देशभरात प्रार्थनांचा ओघ
अरुण जेटली यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात होमहवन करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी ट्वीट करून त्यांच्या चांगल्या तब्येतीची देवाकडे प्रार्थना केली.

आपली प्रतिक्रिया द्या