मोदी इतिहासातील सर्वात भ्रष्ट पंतप्रधान, अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट प्रधानमंत्री असल्याचा घणाघात केला आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई व विरोधी पक्षातील नेत्यांवरील कारवायांवरून आज त्यांनी विधानpसभेत परखड शब्दात भाजप व पंतप्रधानांना फटकारले आहे.

”काय अवस्था केली आहे यांनी देशाची. यासाठीच स्वातंत्र्य मिळवलं होतं का? आता राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं. घाबरता रे तुम्ही, खूपच घाबरट निघालात. हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट प्रधानमंत्री जर कुणी असेल तर हे आहेत. हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वात कमी शिकलेले प्रधानमंत्री असतील तर हे आहेत. आतापर्यंत देशाच्या इतिहासात बारावी पास प्रधानमंत्री कुणीच झालेलं नाही. यांच्याने सरकार चालवलं जात नाही. यांचा अहंकार खूप वाढला आहे. सकाळ, संध्याकाळ याला तुरुंगात टाका, याची सदस्यता रद्द करा. हेच सुरू असते. भाजपच्या सर्व लोंकांना मला आव्हान करायचं आहे. की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आज देशाला बरबाद करायचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांना देशाला बरबाद करायचं आहे त्यांनी भाजपमध्ये रहा. ज्यांना देशाला वाचवायचं आहे त्यांनी आज भाजप सोडा”, असे आवाहन यावेळी केजरीवाल यांनी केले आहे.