मसुरे विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मसुरे मर्डेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी निमीत्त २३ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी विधीवत पुजन, सायं ५ वा. हभप हृदयनाथ गावडे यांचे किर्तन, सायं. ७ वा. स्थानिक भजने, रात्रौ. १० वा. श्री विठ्ठल रखुमाई पालखी प्रदक्षिणा आदि कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.