
सामना ऑनलाईन । बर्मिंघम
बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या पहिली अॅशस कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर चौथ्या डावात 398 धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 7 बाद 487 धावांवर घोषित केला. स्टीव्ह स्मिथने 142, तर मॅथ्यू वेडने 110 धावांची शतकी खेळी केली. इंग्लंडकडून बेनस्टोक्सने सर्वाधिक 3, तर मोईन अलिने 2 आणि ब्रॉड व वोक्सने प्रत्येकी 1 बळी घेतला.
#Ashes2019 दोन्ही डावात शतकं ठोकत स्मिथने विराटचा विक्रम मोडला
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव तीन बाद 124 धावांवरून पुढे सुरू केला. ट्रेवीस हेड आणि स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. हेड अर्धशतकानंतर 51 धावांवर बाद झाला. यानंतर स्मिथ आणि वेडमध्ये 100 धावांची भागिदारी झाली. या दरम्यान स्मिथने आपले 25 वे शतक साजरे केले. दीडशतकाकडे वाटचाल सुरू असताना स्मिथ 142 धावांवर बाद झाला. यानंतर वेडने टीम पेन (34) आणि पेटिन्सन (नाबाद 47) यांना सोबत घेऊन ऑस्ट्रेलियाला 400 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
वेडने शतक झळकावले. शतकानंतर तो 110 धावांवर बाद झाला. यानंतर कमिन्स आणि पेटिन्सन यांनी आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाला वेगाने धावा जमवून दिल्या. कमिन्स 22 आणि पेटिन्सन 47 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 487 झाल्यावर कर्णधार पेनने खेळाडूंना माघारी बोलावले आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 398 धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले. कसोटीचा अद्याप एक दिवस बाकी असून अनिर्णित होण्याची शक्यता आहे.
Australia declare and England require 398 to win!
Centuries for Steve Smith and Matthew Wade in the Australian second innings.#Ashes pic.twitter.com/lX9AaFJJPg
— ICC (@ICC) August 4, 2019





























































