
नागिन या मालिकेसह अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या एका अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होत आहे. तिने एका वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
ही अभिनेत्री म्हणजे आशका गोरडिया. आशका नेहमीच सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस अवतारात फोटो टाकत असते. योगप्रेमी असलेल्या आशकाने तिच्या इन्स्टाग्रामवर टॉपलेस फोटो शेअर केला आहे.
या फोटोत आशका शीर्षासन करताना दिसत आहे. ती टॉपलेस असून तिने पाठीवर #OneLove असं लिहिलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती लिहिते की, हे गंमतीशीर आहे, की जे लोक तुम्हाला सगळ्यात कमी ओळखतात, तेच लोक तुमच्याविषयी सगळ्यात जास्त बोलतात. तुम्हाला ते कळणार नाही असं जेव्हा त्यांना वाटतं, तेही मजेदार असतं. माझे पाय आकाशावर आणि डोकं जमिनीवर आहे. या सगळ्या आयुष्यासाठी माझा कणा मजबूत आहे. त्यामुळे निंदकांनो, तुम्ही तुमचं आयुष्य जगा!, असं ती या फोटोखाली म्हणतेय
हा फोटो सध्या भलताच व्हायरल होत आहे. आशका ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कुसुम, बालवीर, नागिन अशा विविध मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती उद्योजिका व्हायचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यावर भर देत आहे. तिचा स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँडही आहे. आशका आणि तिचा नवरा ब्रेंट हे गोव्यात योगशाळा चालवतात.
View this post on Instagram





























































