आठवले गटाला धक्का, माजी प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी बांधले शिवबंधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिपाइं रामदास आठवले गटाचे माजी प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गायकवाड यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

अशोक गायकवाड हे आंबेडकरी चळवळ आणि बहुजन  चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत. ते रामदास आठवले यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नगर जिल्हय़ात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.