आशियाई युथ वेटलिफ्टिंग, मनमाडच्या आकांक्षाला कास्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनमाडच्या आकांक्षा व्यवहारे हिने उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात  सुरू असलेल्या आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत कास्यपदक पटकावले. आकांक्षाने 40 किलो वजनी गटात आकांक्षाने स्नॅचमध्ये  55 किलो व क्लीन जर्कमध्ये 70 किलो असे एकूण 125 किलो वजन उचलून चमकदार कामगिरी केली. आकांक्षाने कास्यपदक मिळवून सातासमुद्रापार हिंदुस्थानचा  तिरंगा फडकविल्यामुळे शहरातील इतर खेळाडूंनी आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींनी जल्लोष केला.

    आकांक्षा व्यवहारे हिची सलग दुसऱयांदा हिंदुस्थानी युथ वेटलिफ्टिंग  संघात निवड झाली होती. मनमाडसारख्या छोटय़ा शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानचे  प्रतिनिधित्व करणाऱया मराठमोळय़ा आकांक्षाने नाशिक जिह्यातील क्रीडा क्षेत्रासह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे. आकांक्षाला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.