
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यात बहुपत्नीत्वावर बंदी घालणार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाची कायदेशीरता तपासण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
राज्यात बहुपत्नीत्वावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का, याची चौकशी तज्ज्ञ समिती करेल, असेही सांगण्यात आले आहे.


























































