आसाममध्ये धावपट्टीवरून विमान घसरले, चाके चिखलात रुतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील काही दिवसांपासून विविध विमान कंपन्यांच्या विमानांत तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत. गुरुवारी दुपारी आसामच्या जोरहाट विमानतळावरून कोलकात्यात निघालेले विमान धावपट्टीवरून घसरले आणि विमानाची चाके चिखलात रुतली. या घटनेमुळे विमानातील 98 प्रवाशांचा तब्बल 6 तास विमानतळावर खोळंबा झाला. त्यानंतर त्यांच्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.

जोरहाट विमानतळावर गुरुवारी दुपारी 2.20 च्या सुमारास ही घटना घडली. दुसरीकडे मुंबई विमानतळावरून गुजरातच्या कांडला येथे जाणाऱया स्पाईस जेटच्या विमानाचे ‘कॉशन लॅण्डिंग’ करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे टेक ऑफ आयत्यावेळी रद्द केले गेले.