विधान परिषद निवडणूक- अभिजित पाटील, अमरीश पटेल यांचे अर्ज दाखल

2122
election

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडून अमरीश पटेल यांनी तर महाआघाडीतर्फे अभिजित मोतीलाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून विधान परिषदेवर अमरीश पटेल यांची निवड झाली होती, पण त्या वेळी ते काँग्रेस पक्षात होते. भाजपमध्ये दाखल झाल्याने अमरीश पटेल यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पोटनिवडणूक होत आहे. भाजपने पुन्हा पटेल यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीतर्फे शहादा येथील अभिजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे अभिजित पाटील यांचे वडील मोतीलाल पाटील हे भाजपचे नगराध्यक्ष आहेत.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून द्यावयाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने अमरीश पटेल यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक बिनविरोध होईल असा अनेकांचा व्होरा होता. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असताना पटेल यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीतर्फे शहादा येथील अभिजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अभिजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्यासोबत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे मतदार जास्त असल्यामुळे अभिजित पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत अभिजित पाटील विजयी होतील, असा दावा करण्यात आला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना अमरीश पटेल यांच्यासोबत विजय गावीत, आमदार जयकुमार रावल, सुभाष देवरे, सुरेश भामरे, चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल, मुकेश पटेल, प्रतिभा चौधरी यांच्यासह अनेक मतदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या