विधानसभा अध्यक्षांची निवड अर्थसंकल्पीय अधिवेशनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य विधान मंडळाचे वर्ष 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, 3 मार्च 2022 पासून आयोजित करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, गेल्या वेळच्या अधिवेशनासारखी यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणती अडचण येईल असे वाटत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर पक्षश्रेष्ठाr उमेदवारही जाहीर करतील.

कौशल्य विकास विभागाच्या नावात बदल

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे नामकरण आता ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग’ असे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रात स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवीन संकल्पना राबविण्यात येत असून नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.