बुर्किना फासोमध्ये कॅथलिक चर्चवर दहशतवादी हल्ला, अंदाधुंद गोळीबारात 15 जणांचा मृत्यू

terrorist

उत्तर बुर्किना फासोमध्ये कॅथलिक चर्चवर दहशतवादी हल्ला झाला. रविवारी प्रार्थना सभेसाठी जमलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. डौरीच्या बिशपचे पादरी जीन-पियरे सावडोगो यांनी या हल्ल्याची माहिती दिली.

एसॅकेन गावामध्ये रविवारी प्रार्थना सभेसाठी लोकांनी गर्दी केली होती. याचवेळी एका बंदुकधारी हल्लेखोराने चर्चमध्ये प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामुळे चर्चमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. लोकं जीव वाचवण्यासाठी सैरावैरी पळू लागली. या हल्ल्यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांची प्राणज्योत उपचारांदरम्यान मालवली.