
महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणप्रकरणी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय)अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध सुरू असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे. कुस्तीपटूंचा देशभरातून पाठिंबा वाढत असताना हिंदुस्थान ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा यांनी ‘खेळाडूंच्या रस्त्यावरील आंदोलनामुळे देशाची प्रतिमा जागतिक पटलावर मलिन होत आहे,’ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. मात्र कुस्तीपटू बजरंग पुनियानेही आम्हाला ‘आयओए’च्या अध्यक्षांकडून ही अपेक्षा नव्हती, असा पलटवार केला.
पी. टी. उषा म्हणाल्या, हिंदुस्थान ऑलिम्पिक महासंघाची लैंगिक शोषणाविरुद्ध एक समिती आहे. रस्त्यावर उतरण्यापेक्षा कुस्तीपटूंनी या ‘आयओए’कडे यायला हवे होते. कुस्तीपटूंनी असे रस्त्यावर उतरणे हे केवळ कुस्तीसाठीच नव्हे, तर हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्रासाठीच चांगली गोष्ट नाही. अशा प्रकारामुळे हिंदुस्थानची प्रतिमा ही जागतिक क्रीडा क्षेत्रातही मलिन होत आहे.
पी. टी. उषा यांच्या या प्रतिक्रियेमुळे आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली. बजरंग पुनिया म्हणाला, ‘आयओएच्या अध्यक्षांकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. त्या स्वतः एक आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याने आम्हाला त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती. तीन महिने आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही ही रस्त्यावरील लढाई लढत आहोत.’ विनेश पह्गाट म्हणाली, ‘मी स्वतः पी. टी. उषांना पह्न केला होता. कदाचित त्यांच्यावरही दबाव असेल. त्यामुळेच त्या आम्हाला भेटायला येऊ शकल्या नाहीत.’
खेळ अन् खेळाडूंना नेहमीच पाठिंबा – क्रीडामंत्री
कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पेंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, पेंद्र सरकारचे नेहमीच खेळ आणि खेळाडूंना पाठिंबा देण्याचे धोरण राहिलेले आहे. कुस्तीपटू तीन महिन्यांपूर्वी आंदोलनाला बसले होते. त्यावेळी मी हिमाचल प्रदेशचा दौरा रद्द करून जंतरमंतरवर आलो होतो. त्यांना 12 तास वेळही दिला. कुस्तीपटूंच्या सांगण्यावरूनच चौकशी समिती बनविली होती. या समितीत बबिता पह्गाट यांचेही नावही याच खेळाडूंनी सुचविले होते. या समितीच्या 14 बैठकाही झाल्या, असेही त्यांनी सांगितले. मात्र या चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक का केला नाही, या माहितीला त्यांनी बगल दिली. हा अहवाल जाहीर न होताच बृजभूषण शरण सिंह यांनी ‘डब्लूएफआय’चे कामकाज कसे सुरू केले, असा या आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंचा सवाल आहे.





























































