एथर एनर्जीची आणखी दोन अनुभव केंद्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी एथर एनर्जीने बुधवारी दिल्लीतील जनकपुरी आणि गुजरावाला टाऊनमध्ये दोन नव्या अनुभव केंद्रांचे उद्घाटन केले. कंपनीने तीन महिन्यांपूर्वी लाजपत नगरमध्ये पहिले एक्सपेरिअन्स सेंटर सुरू केले होते. त्या केंद्राच्या यशस्वी वाटचालीनंतर दोन नवी केंद्रे सुरू केली आहेत. यासाठी एथर एनर्जीने पीपीएस ग्रुपशी भागीदारी केली आहे. सर्वात वेगवान व स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक असलेली एथर 450 एक्स ही एथर 450 प्लससोबत एथर स्पेसपर टेस्ट राइड व बुकिंगसाठी उपलब्ध असेल.