
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील मौजे बनसावरगाव येथे खून प्रकरणात साक्षीदार असल्याने जातीवाचक शिवीगाळ करून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी एका विरुद्ध अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूर पोलीस ठाण्यात या संदर्भात राकेश बब्रुवान राजमाने याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीच्या मोबाईलवर तुकाराम जाधव याने अश्लिल आणि जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांनाही भर रस्त्यात अडवून तुझ्या मुलाला समजाऊन सांग म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. धक्काबुक्की ही केली. पेट्रोल टाकून जाळून मारण्याची धमकी दिली.
2016 मध्ये गावात झालेल्या गंगधार भ्ज्ञोसले याच्या खून प्रकरणात फिर्यादी हा साक्षीदार असल्यामुळे तुकाराम जाधव हा फिर्यादीस धमकी देत होता. या प्रकरणी पोलीसांनी तुकाराम जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



























































