केजरीवाल यांच्यावर मिरची हल्ला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी एका तरुणाने मिरचीपूड फेकल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या सचिवालयात दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दिल्लीतही मुख्यमंत्री सुरक्षित नाही अशी ‘तिखट’ प्रतिक्रिया देऊन ‘आप’ने भाजपवर निशाणा साधला आहे.

मंगळवारी सकाळपासूनच केजरीवाल सचिवालयातील कार्यालयात हजर होते. दुपारी जेव्हा ते जेवणासाठी कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा अनिलकुमार शर्मा हा तरुण शेजारीच दबा धरून बसला होता. त्याच्याकडे माचिसच्या पेटीत मिरची पावडर होती. केजरीवाल जवळ येताच त्याने ती पावडर केजरीवालांच्या डोळय़ात भिरकावली. या झटापटीत केजरीवाल यांचा चष्माही तुटला.