
प्रशासनातील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम करून देण्यासाठी दहा महिन्यांमध्ये 1 कोटी 55 लाख 69 हजार 435 रुपयांची लाच घेणाऱया 926 लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये सर्वाधिक महसूल विभागाचे तर त्याखालोखाल पोलीस दलातील अधिकारी- कर्मचाऱयांचा समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्यातील 8 परिक्षेत्रांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर 2019 दरम्यान 683 सापळे रचून 926 लाचखोरांना पकडले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत लाचखोरांमध्ये 33 ने वाढ झाली आहे.
मुंबईत कमी लाचखोर
पुणे परिक्षेत्रात 200 लाचखोरांना पकडण्यात आले होते. मराठवाडय़ात 138 नाशिक परिक्षेत्रात 134 लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. मुंबई परिक्षेत्रात लाचलुचपत विभागाने सापळा रचून 47 लाचखोरांना पकडले असून सर्वात कमी लाचखोर मुंबई परिक्षेत्रात आढळून आले.
- सहकार व पणन विभागात अडलेले काम करून देण्यासाठी 16 लाचखोरांनी 6 लाख 56 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारली.
- रस्त्यावर उभा असलेला पोलीस हा लाच घेताना तर कायम दिसतोच, पण एखाद्या गुह्यात मदत करत़ो गुह्यात अडकवण्याची धमकी देत लाच घेण्यामध्ये पोलीस दल राज्यात अग्रभागी आहे. दहा महिन्यांमध्ये 212 लाचखोरांनी 49 लाख 87 हजार 850 रुपयांची लाच स्वीकारली. महसूल विभागत दहा महिन्यांमध्ये 221 लाचखोरांनी 31 लाख 23 हजार 700 रुपयांची लाच घेतली.


























































