कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठवड्या अखेरच्या दोन दिवसात कडकडीत लॉक डाऊन घोषित केला आहे. त्या लॉकडाऊनला जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असून वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरळीत सुरू असले तरी निवासी क्षेत्रात अत्यावश्यक सेवाची दुकाने वगळता सर्वांनीच लॉक डाउन केला आहे.
जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शनिवार आणि रविवार दोन दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन घोषित केला आहे. जिल्हा प्रशासनाने लोक डाऊन संदर्भात कोणती दुकाने सुरू राहतील व काय बंद राहील याबाबतची यादी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. आज प्रत्यक्षात शनिवारी लॉक डाऊनलोड सुरुवात झाली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू विक्री दुकाने यामध्ये गॅस दुकाने औषधालय दवाखाने आधी सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरात तसेच औद्योगिक क्षेत्रात ही दुकाने वगळता सर्वांनी लॉक डाऊन मध्ये सहभाग नोंदविला आहे. दरम्यान शहरालगत असलेल्या चिकलठाणा शेंद्रा चितेगाव वाळूज या औद्योगिक क्षेत्रात छोटे-मोठे कारखाने उद्योग सुरळीत सुरू आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज नगर वडगाव रांजणगाव पंढरपूर जोगेश्वरी साजापूर आधी निवासी क्षेत्रात सर्वांनी लॉक डाऊन मध्ये सहभाग नोंदवून महत्त्वाची दुकाने सुरु ठेवली तर इतर सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून लॉक डाऊन मध्ये सहभाग नोंदविला आहे हॉटेल बार पानटपऱ्या आधी बंद केले आहे
























































