
उत्तर सिडनीमधील एका पब बारबाहेर झालेल्या वादात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर्फिंग स्टार ख्रिस डेविडसन यांना प्राण गमवावे लागले. वादानंतर एका 42 वर्षीय व्यक्तीने डेविडसन यांना जोरदार मुक्का लगावला. या आघाताने डेव्हिस यांचे डोके रस्त्यावरील फुटपाथवर जोराने आदळले आणि त्यातच डेव्हिस यांचा दुःखद मृत्यू झाला. डेविडसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या वतीने 2010 आणि 2011 च्या वर्ल्ड सर्फिंग टूरमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी विश्वविजेते सर्फिंग स्टार केली स्लेटर यांना दोनदा पराभूत केले होते. डेविडसन यांना मुक्का मारणाऱया हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



























































