
लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्ड लवकरच हिंदुस्थानात आपली नवीन जनरेशन Royal Enfield Classic 350 लॉन्च करणार आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये या बाईकच्या अधिकृत टीव्हीसी शूटिंग दरम्यान या बाईकची पूर्ण माहिती उघड झाली आहे. नवीन आरई क्लासिक थेट जावा, जावा फोर्टी टू आणि होंडा सीबी 350 ला टक्कर देणार आहे.
2021 आरई क्लासिक 350 नवीन डबल क्रॅडल चेसिसवर आधारित असेल. जे नवीन Meteor 350 क्रूझरमध्ये देखील पाहायला मिळते. कंपनी याला “जे” आर्किटेक्चर म्हणते. रॉयल एनफील्डच्या भविष्यातील 350 सीसी बाईक तयार करण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. कंपनीचा दावा आहे की, ही ट्वीन डाउनट्यूब फ्रेम Meteor 350 सारखीच याच्या राइडची गुणवत्ता सुधारेल.
नवीन क्लासिक 350 मध्ये इंधन गेज आणि नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह वेगळे डिजिटल रीडआउट देखील मिळेल. यात ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम देखील देण्यात येणार आहे, जे रॉयल एनफील्डने गुगलच्या सहकार्याने विकसित केले आहे. कंपनी यात 349cc चे इंधन-इंजेक्टेड इंजिन देऊ शकते. जे 6,100rpm वर 20.2bhp पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm पीक टॉर्क जनरेट करेल.
कधी होणार लॉन्च?
नवीन आरई क्लासिक 350 1 सप्टेंबर 2021 रोजी लॉन्च होणार आहे. कंपनी याची किंमत 1.80 लाख ते 2 लाख रुपयांदरम्यान ठेवू शकते.





























































