
देशातील आघाडीची दुचाकी निर्मला कंपनी Bajaj Auto लवकरच आपली प्रसिद्ध Pulsar बाईकचा नेक्स्ट जनरेशन मोडलं लॉन्च करणार आहे. अलीकडेच टेस्टिंग दरम्यान ही बाईक पाहण्यात आली होती. ही बाईक दिसायला Pulsar 220F सारखीच आहे. या नवीन बाईकमध्ये कंपनी 250 cc इंजिनचे प्रयोग करू शकते, असे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बाईकचा नवीन मॉडेल अधिक वेगवान असणार आहे. या बाईकचे अलीकडेच समोर आलेल्या फोटोमध्ये बाईक पूर्णपणे कव्हर दिसत आहे. असे असूनही बाईकच्या स्टाईलिंग इत्यादीबद्दल काही माहिती समोर आली आहे. यात कंपनीने मस्क्युलर इंधन टाकी आणि हँडलबार क्लिपसह एक लहान स्क्रीन दिली आहे.
नवीन Pulsar मध्ये कंपनी 250 cc चे इंजिन देऊ शकते. जे 24 bhp ची पॉवर देऊ शकते. RS आणि NS मॉडेल व्यतिरिक्त पहिल्यांदा पल्सर रेंजमधील कोणत्याही दुचाकीला स्टँडर्ड मोनोशॉक सस्पेंशन देण्यात येऊ शकते. कंपनी ही बाईक याच वर्षी लॉन्च करू शकते, असे बोलले जात आहे.

























































