‘ही’ आहे हिंदुस्थानातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार, सिंगल चार्जमध्ये गाठते 523 किमीचा पल्ला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Mean Metal Motors लवकरच हिंदुस्थानात आपली इलेक्ट्रिक सुपरकार Azani सादर करणार आहे. ही कार हिंदुस्थानात उपल्बध असलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये सर्वात पॉवरफुल्ल आणि स्टायलिश कार असणार आहे. या कारचे डिझाइन एरोडायनामिक आहे, ज्यामुळे ही कार काही सेकंदातच जबरदस्त गती प्राप्त करू शकते.

Azani ची डिझाइन McLaren सुपरकारशी प्रेरित असल्याचे दिसत आहे. ही कार पाहून तुम्हाला ही एक विदेशी सुपरकार असल्याचे वाटेल. मात्र असं नसून ही सुपरकार एका स्वदेशी कंपनीने बनवली आहे. हिंदुस्थानी ऑटोमोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कारवर काम करत आहेत. यांचे डिझाइन, रेंज अधिक चांगली आणि उत्तम बनवण्याच्या दिशेने काम करत आहेत. या कारच्या पुढील भागात एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्यामुळे ही कार अधिक स्पोर्टी दिसते. तसेच यात मोठे एअर व्हेंट्स देण्यात आले आहेत. जे कारला थंड ठेवण्यासोबतच एरोडायनामिक बनवतात.

scsc

रेंज बद्दल बोलायचे झाले तर ही कार सिंगल चार्जमध्ये 325 किमीचा पल्ला गाठू शकते. तसेच एकदा संपूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 523 किमीपर्यंत जाऊ शकते. Azani फक्त 2.1 सेकंदात 0 ते 60 प्रति तास गती प्राप्त करते. याची टॉप स्पीड 220 प्रति तास इतकी आहे. ही कार 1000 hp ची जास्तीत जास्त पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. सध्या या कारवर काम सुरू असून येत्या काळात याची लॉन्च डेटलाईनही जाहीर होणार आहे.