सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, प्रती किमि येणार फक्त 20 पैसे खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी बाजारात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आणखीन एका स्टार्टअप कंपनीने एंट्री केली आहे. Geliose असं या स्टार्टअप कंपनीचे नाव आहे. कंपनीने आपली इलेक्ट्रिक स्कूटर Hope लॉन्च केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Geliose Hope ची रनिंग कॉस्ट खूपच कमी आहे. ही स्कूटर प्रति किमी चालवण्याचा खर्च फक्त 20 पैसे इतका आहे. याची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. Geliose Hope ड्राइव्ह करण्यासाठी तुम्हाला वाहन परवान्याची देखील आवश्यकता नाही.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. तसेच यात लिथियम बॅटरी पॅक वापरण्यात आले आहे. या बाईकचा लोव्हर व्हेरिएंट एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर 50 किमीपर्यंत धावू शकते. तसेच याचा टॉप व्हेरिएंट एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर 75 किमीपर्यंत धावू शकतो. या व्यतिरिक्त, या स्कूटरमध्ये पॅडल ही देण्यात आले. जेणेकरून तुम्ही अधिक लांबीचा पल्ला गाठू शकता. या स्कूटरची प्रारंभिक किंमत 46,999 रुपये इतकी आहे.