2021 Skoda Octavia हिंदुस्थानात लॉन्च, किंमत फक्त…

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Skoda ने हिंदुस्थानात आपली नवीन Octavia सेडान लॉन्च केली आहे. ही चौथ्या जनरेशनची Octavia असून कंपनीने ही कार दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. आज आपण याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

या कारची सेडानची लांबी 4,689 मिमी, उंची 1,469 मिमी आणि रुंदी 2,003 मिमी आहे. या कारमध्ये 2,680 मि.मी. व्हिल्बेस आणि 17 इंच एलॉडी व्हील देण्यात आले आहे. नवीन Octavia मध्ये फ्रंट फ्रेममध्ये एक ग्रिल देण्यात आले आहे, ज्याला अधिक प्रीमियम लुक देण्यासाठी क्रोम ट्रीट देण्यात आली आहे.

इंजिन आणि किंमत

नवीन स्कोडा Octavia मध्ये कंपनीने 2.0-लीटर टीएसआय पेट्रोलिंग इंजिनचा वापर केला आहे. जे 188 bhp ची पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 25.99 लाख रुपये आहे. तसेच याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 28.99 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या