Suzuki Avenis Scooter हिंदुस्थानात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुझुकी मोटरसायकल इंडियाने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन Avenis Sporty स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर दिसायला अत्यंत स्टायलिश असून कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. हिंदुस्थानात याची टक्कर TVS NTorq आणि Honda Dio शी होणार आहे. कंपनीने तरुणाईला लक्षात घेऊन ही स्कूटर डिझाइन केली असल्याचे बोलले जात आहे. चला तर या स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

नवीन Suzuki Avenis स्कूटर मेटॅलिक मॅट फायब्रोइन ग्रे, मेटलिक लश ग्रीन कलर्स, पर्ल ब्लेझ ऑरेंज, ग्लास स्पार्कल ब्लॅक, मेटॅलिक मॅट ब्लॅक, ग्लास स्पार्कल ब्लॅक, पर्ल मिराज व्हाईट, मेटलिक मॅट फायब्रोइन ग्रे मध्ये आणि मेटल ट्रायटन ब्लू ग्रे या रंग पर्यायसह उपलब्ध होणार आहे. Avenis स्कूटरमध्ये FI तंत्रज्ञानासह 125cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन हे इंजिन 6750rpm वर 8.7 PS ची पॉवर पॉवर आणि 5500rpm वर 10Nm टॉर्क जनरेट करते. याचे वजन 106 किलो इतके आहे.

फीचर्स आणि किंमत

यात कंपनीने टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टम दिले आहे. तसेच यात बॉडी-माउंट एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी टेल लॅम्प सारखे अनेक फीचर्स दिले आहेत. कंपनीने या स्कूटरची प्रारंभिक किंमत 86,700 रुपये (एक्स -शोरूम) इतकी आहे.